Download App

राज्यातील तापमानाचा पारा घसरला, हुडहुडी वाढली, पाहा आपल्या जिल्ह्याचं तापमान

मुंबई : राज्यभरात थंडीचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळतंय. विविध जिल्ह्यांत पारा घसरल्यानं हुडहुडी भरल्याचं पाहायला मिळतंय. थंडी वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्यात. अनेक जिल्ह्यात 15 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झालीय. विशेषत: उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाक्यात वाढ झाली आहे. मुंबईतही थंडी वाढल्याचं पाहायला मिळतंय.

काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याचं दिसून येतंय. राज्यात पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. पुढचे दोन दिवस मुंबईसह उत्तर कोकणातील काही भागांत थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय. राज्यात सरासरी 14 ते 15 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळं राज्यात थंडीचा जोर वाढल्याचं दिसून येतंय.

*पाहा तुमच्या जिल्ह्यातील तापमान* :
पुणे – 10.2
सांताक्रुज – 15.2
नागपूर – 14.3
सोलापूर – 16.2
सातारा – 19.1
डहाणू – 14.1
नांदेड -16.8
उदगीर – 16
औरंगाबाद – 11
कुलाबा – 18
कोल्हापूर -16.9
उस्मानाबाद – 16
रत्नागिरी – 16.6
माथेरान – 14.4
मालेगाव – 14.6
जळगाव – 10.2
जालना – 11
महाबळेश्वर – 13.5
नाशिक – 9.6
परभणी – 15.2

Tags

follow us