Download App

सत्तासंघर्षाच्या सुनावणीत राज्यपालांच्या भूमिकेवर सरन्यायाधीशांनी केली प्रश्नांची सरबत्ती

  • Written By: Last Updated:

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवरील या आठवड्यातील सलग दुसऱ्या दिवशी आज सुनावणी होणार आहे. सत्तासंघर्षावरील आतापर्यंत ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली आहे तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला.

आज सुनावणीच्या दरम्यान पहिल्यांदा तुषार मेहता राज्यपालांची बाजू मांडत आहेत. पण तुषार मेहता राज्यपालांची बाजू मांडत असताना सरन्यायाधीश यांना अनेक प्रश्न विचारून अनेक मुद्दे उपस्थित केले. याशिवाय सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी अनेक निरीक्षणेही नोंदवली.

बहुमत चाचणीचा प्रश्न का आला?

सत्तासंघर्षाच्या वादामध्ये शिवसेनेतील ३४ आमदार पक्षनेतृत्वावर नाराज होते. पण ते पक्षातच होते. ते पक्षातून बाहेर पडल्याचं त्यांनी सांगितलं नाही. मग जर ते शिवसेनेच्या ५६ सदस्यांपैकीच होते तर मग बहुमत चाचणीचा प्रश्न कुठे येतो? कशाच्या आधारावर राज्यपालांनी बहुमत चाचणीचे निर्देश दिले? असा प्रश्न सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी उपस्थित केला.

एका रात्रीत संसार कसा मोडला ?

आमदारांना केवळ धमक्याच नव्हत्या. तर, काही ठिकाणी हल्लेही झाले. म्हणून राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावली, असा युक्तिवाद तुषार मेहता यांनी केलं. ते पुढे म्हणाले कि पुढे अधिवेशन आहे म्हणून राज्यपालांनी मौन बाळगणे योग्य आहे का?

त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विचारलं की 3 वर्षांत तुम्ही एकही पत्र लिहिले नाही आणि एका आठवड्यात सहा पत्रे कशी लिहिली? आणि 3 वर्षे आनंदाने नांदल्यानंतर एका कारणामुळे एका रात्रीत संसार कसा काय मोडला? हा प्रश्न राज्यपालांनी विचारला नाही का?

हे सगळं तीन वर्षांनंतर कसं घडल?

शिवसेनेतला एक गट काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्यामुळे नाराज होता, असा युक्तिवाद केला जात असला तरी आज सरन्यायाधीशांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की या सगळ्या घडामोडी सरकार स्थापन झाल्यानंतर महिन्याभरात घडल्या नाहीत. हे सगळं तीन वर्षांनंतर घडत होतं. त्यामुळे अचानक एक दिवस त्या ३४ जणांना वाटलं की काँग्रेस-राष्ट्रवादीशी मतभेद आहेत. असं कसं?

याच मुद्द्यावर पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यपालांनी दोन गोष्टी लक्षात घेतल्या नाहीत. एक तर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नव्हते. दोघांकडे मिळून ९७ आमदार आहेत. हाही फार मोठा गट होता. शिवसेनेच्या ५६पैकी ३४ आमदारांनी अविश्वास दर्शवला. त्यामुळे तीन पक्षांपैकी एका पक्षात मतभेद झाल्यानंतरही इतर दोन पक्ष आघाडीत कायम होते.

Tags

follow us