Bhandara Police : भंडारा शहरातून एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. शहरातील मणप्पूरम गोल्ड लोन बँकेच्या (Manappuram Gold Loan Bank) मॅनेजरने (Manager) एकाची तब्बल 18 लाखांची फसवणूक केली आहे. यानंतर खातेदार अमित जोशी (Amit Joshi) यांनी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यलयात (Bhandara District Superintendent of Police Office) विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं विषप्राशन करणाऱ्या अमित जोशी यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
अमित जोशी यांचा मुलगा हिमांशू यांने गेल्या महिन्यात मणप्पूरम गोल्ड लोन बँकेत 292 ग्रॅम सोने (29 ते 30 तोळे) गहाण ठेवले होते. 292 ग्रॅम सोने गहाण ठेऊन त्यावर त्यांनी तब्बल 18 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते मात्र ज्या कामासाठी पैशाची गरज होती ते काम पुढे ढकल्याने त्यांचे पैसे बँकेेतच होते. काही दिवसानंतर त्यांनी याबाबत माहिती घेतली असता मणप्पुरम बँकेचा मॅनेजर रोहित साहू (Rohit Sahu) याने जोशी यांच्या खात्यातून ती रक्कम परस्पर फसवणूक करीत स्वत: च्या खात्यावर वळविली असल्याची माहिती त्यांना कळली. तसेच बँक मॅनेजर साहू हा गायब झाला असल्याची देखील माहिती त्यांना मिळाली.
यानंतर त्यांनी साहू यांच्याशी संपर्क साधला असता तो उडवा- उडवीचे उत्तर देत असल्याने या प्रकरणात जोशी यांनी 18 ऑगस्ट रोजी भंडारा पोलिसात बँक मॅनेजर साहूविरोधात गुन्हा दाखल केला. भंडारा पोलिसांनी बँक मॅनेजर साहूविरोधात भारतीय दंड विधान 316 (2), 318 (4) कलमान्वय गुन्हा दाखल केला आहे.
मेगास्टार चिरंजीवी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘विश्वम्भरा’ चित्रपटाची खास झलक
सध्या या प्रकरणात भंडारा पोलीस तपास करीत आहे. मात्र आपली 18 लाखांची फसवणूक झाल्याने अमित जोशी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात विषप्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.