भारतात सोनंच सोनं! वर्ल्ड गोल्ड काउंसिलचा अहवाल, आकडे ऐकून व्हाल थक्क..

भारतात सोनंच सोनं! वर्ल्ड गोल्ड काउंसिलचा अहवाल, आकडे ऐकून व्हाल थक्क..

Gold in India Report : भारतात घरात सोने ठेवण्याची परंपरा खूप जुनी आहे. भारतीय लोक (Gold in India) सोन्यात गुंतवणूक (Investment in Gold) मोठ्या प्रमाणात करतात. सण उत्सव, लग्न समारंभ, शुभ मुहूर्त यांसारख्या प्रसंगी हमखास सोने खरेदी (Gold Purchase) केली जाते. याच संदर्भात वर्ल्ड गोल्ड काउन्सिलने नुकताच एक अहवाल (World Gold Council) जारी केला आहे. यानुसार भारतातील घरे आणि मंदिरांत जवळपास 25 हजार टन (Gold in India) सोने आहे. या सोन्याची किंमत सध्याच्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या (Pakistan Economy) सहा पट जास्त आहे.

देशातील घरांत आणि मंदिरांत सध्या जितके सोने आहे त्याची किंमत 2.4 ट्रिलियन अमेरिकी डॉलर इतकी असू शकते. EGC च्या आकडेवारीनुसार भारतातील घरांत असणारे (Indian People) सोने जागतिक पातळीवर एक असाधारण आर्थिक संपत्ती आहे. या संपत्तीची किंमत इतकी जास्त आहे की अनेक देशांचा जीडीपीही या तुलनेत खूप कमी आहे.

भारताचे मोठ्या प्रमाणावर सोने खरेदीमागे कारण काय?, आरबीआयने खरेदी केले ‘इतके’ टन सोनं

पाकिस्तानची अर्थव्यवस्था काहीच नाही

पाकिस्तानची अर्थव्यवस्था ज्याचा जीडीपी 400 अब्ज डॉलर्सच्या आसपास (Pakistan GDP) असेल असा अंदाज व्यक्त केला जातो. पण भारतातील मंदिरे आणि घरातील सोन्याच्या तुलनेत हा जीडीपी अगदीच किरकोळ दिसू लागतो. आजमितीस पाकिस्तानी अर्थव्यवस्थेच्या सहा पट जास्त सोने फक्त मंदिरांत (Temples in India) आणि घरात साठवून ठेवलेलं आहे.

आर्थिक तज्ज्ञांच्या मते हे सोनं वैयक्तिक संपत्ती म्हणून महत्वाचं आहेच त्याबरोबरच देशाच्या आर्थिक स्थिरतेतही योगदान देते. परंतु, इतक्या मोठ्या प्रमाणात सोन्याच्या साठवणुकीमुळे काही आव्हानेही निर्माण झाली आहेत. या सोन्याला देशाच्या अर्थव्यवस्थेत सक्रिय रुपाने वापरात आणण्याची गरज आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे वैयक्तिक संपत्तीचा योग्य उपयोग होईल तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल.

जागतिक बँकेत भारताचं सोनं

भारताने आपल्याकडे असलेल्या सोन्यापैकी बहुतांश सोने इंग्लंड आणि इतर जागतिक बँकेत (World Bank) ठेवले आहे. सोने सुरक्षित गुंतवणूक (Gold Investment) आहे. अडचणीच्या काळात ते कामाला येते. त्यामुळे आर्थिक स्थैर्य येते. आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि परदेशी कर्जाचा धोका देखील सोने खरेदीमुळे कमी होईल. याशिवाय जागतिक स्तरावर भारतीय रुपया मजबूत करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा धोरणात्मक प्रयत्न मानला जात आहे.

कॅन्सरची लक्षणे दिसण्याच्या आधीच कळणार आजाराचा पत्ता; चमत्करिक शोध यशस्वी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube