मुंबई : राज्याच्या (Maharashtra)अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget Session)आजपासून दुसरा आठवडा सुरु होतोय. सध्या राज्यातील विविध भागात अवकाळी पावसानं (Avakali Paus)धुमाकूळ घातलाय. त्यामुळं शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. याच मुद्द्याला धरुन आज विरोधकांकडून अवकाळी पावसामुळं शेती (Agriculture) पिकाला बसलेला फटका, शेती मालाला हमीभाव आदी मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याची सक्यता आहे.
राज्यात मागच्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसानं चांगलाच धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळलंय. त्याचा सर्वाधिक फटका शेती पिकांना बसलाय. त्यामुळं शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावल्याचं पाहायला मिळातंय. आता शेतकऱ्यानं आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणं जपलेल्या पिकाची आपल्या डोळ्यासमोर नासाडी होताना त्याला पाहावी लागली. त्यामुळं आता शेतकरी चांगलाच संकटात सापडल्याचं पाहायला मिळतंय.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या संवदेनशीलपणाची पुन्हा प्रचिती; चिमुकलीला देणार सर्वोत्तम उपचार
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून तात्काळ मदत होण्यासाठी विरोधी पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कांदा, कापूस, मेथी, कोथिंबीर, सोयाबीन या शेतमालाला भाव नाही. शेतकऱ्यांचा कांदा अजूनही कमी दरानंच खरेदी केला जातोय. त्यामुळं सरकारनं शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी विरोधकांकडून केली जातेय.
राज्याचा अर्थसंकल्प उद्या (दि.9) सादर केला जाणार आहे. आज राज्याचं आर्थिक धोरण सभागृहात मांडलं जाणारंय. त्यावरुनच राज्याची आर्थिक स्थिती कशी आहे? हे लक्षात येईल. राज्याचे अर्थमंत्री देवंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
उद्या सभागृहात सादर केला जाणारा अर्थसंकल्प हा आगामी काळातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मांडला जाणारंय, त्यामुळं अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.