transfers of IAS officers in the state special commissioner to Nashik for Kumbh Mela : गेल्या काही महिन्यांपासून राज्यांमध्ये आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू आहे. यामध्ये आज पुन्हा एकदा राज्य शासनाने वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत त्या बदल्यांमुळे रत्नागिरी नाशिक जळगाव या जिल्ह्यांसह राज्यातील महत्त्वाच्या प्रशासनिक पदांवर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यामध्ये रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबईचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चोडणेचे महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांची नाशिकच्या कुंभमेळ्याच्या आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सरन्यायाधीशांवर बूट फेकल्याचा प्रकार, सरन्यायाधीश गवई यांच्या आई म्हणाल्या…
नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नाशिकच्या महानगर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिकच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची जळगावच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मोदी सरकारचा मोठा निर्णय; दिवाळी आणि छठनिमित्त रेल्वे प्रवाशांना गिफ्ट अन् 4 नवीन मर्गांची घोषणा
शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक संजय कोलते यांची रिक्त पदावर पुण्याचे साखर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबईचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. मनोज जिंदाल यांची रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.