Their coin will not work without me, Sharad Pawar’s taunt to Ajit Pawar : माझ्याशिवाय त्यांचे नाणे चालणार नाही. अशा अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांनावर ( Ajit Pawar) पहिला हल्ला केला. तसेच काल शरद पवारांनी त्यांचा फोटो न वापरण्याची ताकित अजित पवारांना दिली. त्यात आज पवारांनी माझ्याशिवाय त्यांचे नाणे खणखणणार नाही असे म्हटले आहे. पवारांच्या नेतृत्वात आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठक झाली. त्यावेळी शरद पवार (Sharad Pawar) बोलत होते.
परंतु काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंनी (Supariya Sule) अजितदादा अभिताब बच्चन (Amitabh Bachchan) असल्याचा उल्लेख करत बच्चन सगळ्यांनाच हवा असतो असे म्हटले होते. त्यानंतर आज पवारांनी माझ्याशिवाय त्यांचे नाणे खणखणणार नाही असं म्हटले आहे. त्यामुळे आता सुप्रिया सुळे (Supariya Sule) यांची अजित पवार यांच्या विषयीची भूमिका बदलणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. (Their coin will not work without me, Sharad Pawar’s taunt to Ajit Pawar)
अजित पवारांनी बंड केल्यानंतर सर्व आमदारांचं समर्थन आपल्याला आहे, असा दावा केला होता. या दाव्यावर बोलतांना पवार म्हणाले की, चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही. आम्ही घड्याळ, हात, चरख्यावर लढलो. माझा फोटो त्यांनी वापरला. कारण त्यांना माहित आहे, आपलं नाणं चालणार नाही, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
दोन्ही गटांचा राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा; ठोठावलं निवडणूक आयोगाचं दार
तुमच्या मतदीने राज्याच्या कानोकोपऱ्यात नेतृत्वाची फळी तयार करण्यात पक्षाला यश आलं. सामान्य कार्यकर्ते हे आमदार, खासदार मंत्री झाले. राष्ट्रवादीने अनेक न्यायी नेते तयार केले. मनात एकच भाव होता राज्याचा चेहरा बदलवण्याचा. सामान्य माणसांच्या जीवनात प्रकाश कसा येईल, यासाठी पक्ष झटत राहिला. आता आपल्याला आणखी पुढं जायचं. आम्ही सर्वजण सत्ताधारी पक्षात नाही. लोकांमध्ये आहोत. लोकशाही टीकवायची असेल तर संवाद महत्वाचा आहे. मात्र, देशात संवाद राहिलेला नाही. मात्र, आम्ही विरोधकांना एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू केले, असं पवार म्हणाले.