मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधून (Maha Vikas Aghadi Govt) बाहेर पडत एकनाथ शिंदेंनी ठाकरे सरकार पाडलं. शिवसेनेचे ४० आणि अपक्षांना धरून एकूण ५० आमदारांच्या मदतीनं शिंदेंनी भाजपसोबत जाऊन नवं शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी आपल्याच नेतृत्वाविरोधात बंड केलं होतं. त्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानल्या गेला. त्यानंतर राज्याच्या राजकारणनात अनेक घडामोडी घडल्या. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना नाव शिंदे गटाला दिलं. दरम्यान, आता महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात नियमीतपणे सुनावणी झाली आहे. दरम्यान, अशातच आता ज्योतिषाचार्य सिध्देश्वर मारटकर (Astrologer Siddeshwar Martkar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारसाठी जुलैपर्यंत कठीण काळ असल्याचा दावा केला आहे.
मारटकर यांनी सांगितले की, शिंदे-फडणवीस सरकारच्या शपथविधीची पत्रिका अभ्यासल्यानंतर असं दिसतं की, जुलै महिन्यापर्यंत शिंदे-फडणवीस सरकारसाठी कठीण काळ आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल जर २१ मार्चच्या पुढे गेला तर त्यानंतर जो निकाल लागेल तो निकाल हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लागेल, असा दावा केला आहे. ते म्हणाले, २१ एप्रिलच्या आधी सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला तर सत्ताधारी पक्षाच्या बाजूने निकाल लागेल. एप्रिलमध्ये निकाल लागला तर सत्ताधाऱ्यांची अडचण होणार आहे. दरम्यान, जुलै महिन्यापर्यंत जर सरकार स्थिर राहिलं तरच सरकार पुढं टीकेल, असं ते म्हणाले.
https://www.youtube.com/watch?v=fF8gDejsOa8
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. राज्यात झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर ही सुनावणी सुरू आहे. या सुनावणी संदर्भात बोलतांना मारटकर यांनी हे दावे केले.
शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. बंडानंतर शिंदे गटाने भाजपबरोबर हात मिळवत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा दावे विरोधकांनी केले होते. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी राज्यात मध्यावधी निवडणूका लागतील असं विधान केलं होतं. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा सत्तांतर होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता माटकर यांनीही जुलैपर्यंत शिंदे सरकारसाठी प्रतिकुल काळ असल्याचा भाकीत केल्यानं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.
Kasba By Election Result : आधी कोणती मते मोजणार सदाशिव पेठ की सोमवार पेठ?
मारटकर यांनी २०१९ मध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतील, असा दावाही केला होता. तो दावा खरं ठरला. त्यामुळं आगामी काळात राज्याच्या राजकारणात काय घडामोडी घडतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.