They Busy in buying factories Shahaji Bapu’s attack on Tanaji Sawant, who not present at party program : शिंदे गटाचे
माजी आमदार शहाजी बापू यांनी सोलापूरात एक पक्षाचा कार्यक्रम घेतला. यावेळी त्यांना पत्रकारांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रश्न विचारले. यावेळी पत्रकारांनी शहाजी बापूंना तानाजी सावंतांच्या पक्षीय कर्यक्रमाला उपस्थित न राहण्यावर प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना पक्षीय कार्यक्रमाला उपस्थित नसणाऱ्या सावंताना टोला लगावला आहे.
काय म्हणाले शहाजी बापू?
यावेळी पत्रकारांनी शहाजी बापूंना तानाजी सावंतांच्या पक्षीय कर्यक्रमाला उपस्थित न राहण्यावर प्रश्न केला असता शाहाजी बापू म्हणाले की, सोलापूरमध्ये त्यांचा फोटो असण्याचं काही कारणं आहे. कारण ते धाराशिवचं नेतृत्व करत आहेत. त्याचबरोबर तानाजी सावंत आजकाल पक्षीय कार्यक्रमाला दिसत नाहीत कारण ते एक मोठी शिक्षण संस्था चालवतात. तसेच त्यांचे पाच-सहा कारखाने आहेत. काही कारखाने त्यांना खरेदी करायचे आहेत. या सगळ्या व्यापात ते सध्या गुंतलेले आहेत. त्यामुळे ते सध्या पक्षीय कार्यक्रमामध्ये दिसत नाहीत. असं म्हणत शहाजी बापूंनी सावंताना टोला लगावला आहे.
भारताच्या जीडीपीमध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींना विश्वास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी देशातील 140 कोटी जनता उभी आहे. त्यामुळे त्यांनी मागे न पाहता निश्चतपणे पाकिस्तानला धडा शिकवावा. तसेच भारताने पहिलं पाऊल टाकलं आहे. त्यावर आता पाकिस्तान काय कारवाई करतो यासाठी सरकारसह संपूर्ण देश तयार आहे. तसेच न्युक्लिअर बॉम्बची धमकी देणाऱ्या पाकिस्तानने भारताची ताकद ओळखावी. तसेच पहलगाम हल्ला हा धर्म विचारून झाला नसल्याचं शरद पवार म्हणाले कारण ते पिडीतांना भेटायला गेले त्यात त्यांचा तो गैरसमज झाला. पण नंतर त्यांनी माहिती देखील घेतली आहे. मात्र वडेट्टीवारांनी जे काही विधा केलं आहे. ते अत्यंत चुकीचं आहे. ते केवळ विरोधाला विरोध करत आहेत. असंही शहाजी बापू म्हणाले.