अमेरिका लैंगिक छळ प्रकरणात भारतातील तीन आजी-माजी खासदारांची नावं, पृथ्वीराज चव्हाणांचा नवा गौप्यस्फोट

US sexual harassment case या प्रकरणात आता भारतातील तीन आजी-माजी खासदारांची नावे असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

Pruthviraj chavan

Pruthviraj chavan

Three former Indian MPs named in US sexual harassment case, Prithviraj Chavan’s new revelation : अमेरिकेत जेफ्री एपस्टाईन प्रकरणावरून पुन्हा एकदा मोठा राजकीय व सामाजिक गोंधळ उफाळून आला आहे. लैंगिक शोषण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील गैरव्यवहारांमुळे चर्चेत असलेल्या या प्रकरणात आता भारतातील तीन आजी-माजी खासदारांची नावे असल्याचा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

गोवा नाईटक्लब आग प्रकरणातील आरोपी लुथरा बंधूंना भारतात परत आणलं; थायलंडमध्ये झाली होती अटक

पृथ्वीराज चव्हाण यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये झालेल्या वार्तालापादरम्यान बोलताना सांगितले की, एपस्टाईन प्रकरणाशी संबंधित काही गोपनीय कागदपत्रे 19 डिसेंबर रोजी बाहेर येणार असून, त्यामध्ये भारतातील तीन आजी-माजी खासदारांचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहेत. या प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा प्रभाव असून, केवळ अमेरिकेपुरते मर्यादित न राहता अनेक देशांतील प्रभावशाली व्यक्तींची नावे यात गुंतलेली असल्याचे त्यांनी सूचित केले.

अजित पवारांचा ‘एकला चलो’चा मोठा डाव; पुण्यात वेगळ लढण्याच्या निर्णयाने काय होणार?

जेफ्री एपस्टाईनवर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप होते. त्याच्या संपर्कात अनेक राजकीय नेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटी असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे. अमेरिकेत सध्या या प्रकरणाशी संबंधित फाईल्स, साक्षी आणि नव्या खुलाशांमुळे राजकीय वर्तुळात तणावाचे वातावरण आहे.

IPL 2026 Auction : भारतीय खेळाडूंना धक्का, पृथ्वी शॉ पाठोपाठ सरफराज खान देखील अनसोल्ड

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानानंतर भारतीय राजकारणातही खळबळ उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित व्यक्तींची नावे अद्याप अधिकृतपणे समोर आलेली नसली, तरी या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात पुढे कोणती नावे उघड होतात आणि भारतात याचे राजकीय पडसाद कसे उमटतात, याकडे देश-विदेशातील माध्यमांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version