टायगर श्रॉफवर हल्ला अन् चमको लगेच बघायला गेले ; शिंदेंवर ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackera : हे डबल इंजिनचं सरकार फक्त आश्वासनं देत आहे. सरकार केवळ घोषणा करतंय. राज्य सरकारने कर्ज माफी जाहीर केली आहे.

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : हे डबल इंजिनचं सरकार फक्त आश्वासनं देत आहे. सरकार केवळ घोषणा करतंय. राज्य सरकारने कर्ज माफी जाहीर केली आहे पण किती शेतकऱ्यांना याचा लाभ भेटला हे कुणालाच माहिती नाही अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना केली आहे.

केंद्रीय पथक येऊन गेला, काय पाहिलं, किती पंचनामे केले? नेमकी मदत कुणाला मिळणार आणि किती मिळणार हे कुणालाच माहिती नाही. आज राज्यात शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे आणि फक्त 5 हजार रुपये तुम्ही तोंडावर फेकताय. शेतकऱ्यांची केवळ चेष्टा चालवली आहे असं या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले.

तर दुसरीकडे या मेळाव्यातून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला. राज्यात गरीब शेतकऱ्यांच्या मुलांकडे कपडे नाहीत आणि स्वतःला शेतकऱ्यांचा मुलगा म्हणवणारे हेलिकॉप्टरने फिरत आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तर यावेळी त्यांनी अभिनेता टायगर श्रॉफवरील (Tiger Shroff) हल्ल्याच्या घटनेवरून देखील एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. टायगरवरील हल्ल्यानंतर चमको लगेच बघायला गेले. टायगरचं नशीब बलवत्तर होतं म्हणून तो बचावला. शस्त्र घेऊन राज्यात आरोपी आले कसे? पोलिसांना हे शस्त्र घेऊन फिरणारे गुंड दिसले नाहीत का? कोणत्या पद्धतीनं तुम्ही सरकार चालवताय? मग कशासाठी तुमच्या नाकाबंद्या असतात अशी टीका उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात बोलताना केली.

ठाकरेंचा दसरा मेळावा सत्तापिपासूंचा ; ज्योती वाघमारेंचा उबाठावर हल्लाबोल-

Exit mobile version