Trupti Desai : करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी वांद्रे कौटुंबिक न्यायालयात (Bandra Family Court) मंत्री धनंजय मुंडेंविरोधात (Dhananjay Munde) घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला होता. या घरगुती हिंसाचार प्रकरणांमध्ये करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप न्यायालयाने मान्य केले. तसेच करुणा शर्मा यांना दरमहा २ लाख रुपये पोटगी देण्याचे आदेशही कोर्टाने दिले. यावर आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी भाष्य केलं. धनंजय मुंडे यांच्या पापाचा घडा भरत आला. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी देसाईंनी केली.
ट्रम्प यांचा आणखी एक मोठा निर्णय! महिलांच्या खेळात तृतीयपंथीयांना नो एन्ट्री !
कोर्टाच्या निकालानंतर तृप्ती देसाईंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना देसाई म्हणाल्या की, करुणा मुंडे न्याय मागण्यासाठी अनेक ठिकाणी गेल्या. अनेक नेत्यांकडे अर्ज केले मात्र त्यांना न्याय मिळाला नव्हता. गेल्या तीन वर्षापासून करूणा मुंडे या न्यायालयाची लढाई लढत होत्या. आज अखेर त्यांना न्याय मिळाला. त्या वारंवार सांगायच्या की, मी करुणा शर्मा नाही, तर करुणा धनंजय मुंडे आहे. धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी आहे. आज अखेर कोर्टाने त्यावर शिक्कामोर्तब केलं आणि धनंजय मुंडेंनी हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवलं आहे.
सकाळी लग्न… दुपारी सप्तपदी, संध्याकाळी नवरीनं ठोकली धूम, लग्नाची स्टोरी व्हायरल
पुढं त्या म्हणाल्या की, आजवर धनंजय मुंडेंनी राजकीय बळाचा आणि पदाचा वापर करून अनेक गैकृत्य केली आहेत. मात्र, धनंजय मुंडे यांच्या पापाचा घडा आता भरत आलेला आहे. मला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना विचारायच आहे- धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवलं आहे. पत्नीचा छळ करणारा पती तुमच्या मंत्रिमंडळात आहे. त्याला तुम्ही मंत्रिमंडळात ठेवणार आहात का? असा सवाल करत फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
सुषमा अंधारे म्हणाल्या की, करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्या केसमध्ये कोर्टाने दिलेल्या निर्णय अभिनंदन करण्यासारखा आहे. हा लढा फक्त महिलेच्या आर्थिक नुकसाना बाबतचा नाही तर तो महिलांच्या आत्मसन्मानाचा लढा आहे. ज्या धीराने, ज्या संयमाने करुणा मुंडे यांनीही लढत दिली ती काबिल ए तारीख आहे. एकल लढा देणाऱ्या महिलांसाठी हा संपूर्ण प्रवास हा प्रेरणादायी आहे, असं अंधारे म्हणाल्या.
पुढं अंधारे म्हणाल्या की, या सर्व प्रकाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना सर्व माहिती होती. असं असताना देखील धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात का सामावून घेण्यात आलं? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
मंत्रिपदाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार फडणवीस यांना असताना देखील त्यांनी का कानावरती हात ठेवले आहेत. हा कळीचा मुद्दा असून याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करणे आवश्यक असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या.