Tukaram Mundhe clarifies rumors regarding his transfer said fight against adulteration continues at FDA : राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदी धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेव्हा पासून त्यांनी अवैध, भेसळ तसेच अस्वच्छता असणाऱ्या अस्थापनांवर थेट परवाना निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर आता मात्र त्यांच्या बदलीच्या चर्चा सुरू आहेत त्यावर आता त्यांनी स्वत: ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे.
नेमकं काय म्हणाले आयुक्त तुकाराम मुंढे?
नाही, माझी FDA मधून बदली झालेली नाही. मी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र येथे आयुक्त म्हणून कार्यरत आहे. भेसळयुक्त अन्न आणि निकृष्ट औषधांविरुद्धची आमची लढाई सुरूच आहे.
No, I have not been transferred from FDA.
नाही, माझी FDA मधून बदली झालेली नाही.I continue to serve as Commissioner, FDA Maharashtra. Our fight against unsafe, substandard, adulterated food and spurious, substandard drugs goes on.
मी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र येथे आयुक्त म्हणून कार्यरत आहे. भेसळयुक्त अन्न आणि निकृष्ट औषधांविरुद्धची आमची लढाई सुरूच आहे.
#TukaramMundhe #Trust
— Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) October 12, 2026
तुकाराम मुंढेंच्या बदलीच्या चर्चा का?
MPSC संदर्भात आपल्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी 11 दिवस पुण्यामध्ये आंदोलन सुरू होतं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीममवार यांचा राजीनामा घ्यावा, ही त्यामधील प्रमुख मागणी होती. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होतं. विद्यार्थ्यांनी आता हे आंदोलन मागे घ्यावं यासाठी राज्याचे मंत्री शिवेंद्रराजेंनी रोहित पवार आणि आंदोलकांची भेट घेतली.
दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा! कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर, असं तपासा लाभार्थ्याचं नाव
त्यांनी मुख्यमंत्री त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केलं. याचवेळी एमपीएससी आयोगाच्या कारभारच्या चौकशी समितीच्या सचिवपदाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. तसेच चौकशी पुर्ण होईपर्यंत अध्यक्ष भीमनवार हे पदापासून दूर राहतील. असंही सांगण्यात आलं.
मात्र यावेळी अनेकांनी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून त्यांना एमपीएससीच्या सचिव पदी नियुक्त करण्यात आले आहे. अशा चर्चा झाल्या. मात्र तसे नसून त्यांची एफडीए आयुक्त पदावरून बदली झालेली नसून ते केवळ चौकशी समितीचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे या चर्चांवर स्वत: मुंढे यांनी एक्स पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे.
