Ranajagjitsinh Patil : तुळजापूर विधानसभा निवडणूक प्रचारार्थ भाजप उमेदवार (Ranajagjitsinh Patil) राणाजगजितसिंह पाटील यांची वाघोली येथे आशीर्वाद यात्रा संपन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केलं. गावातील डॉक्टर साहेबांच्या जुन्या सहकाऱ्यांच्या भेटी घेऊन राणा पाटील यांनी आशीर्वाद घेतले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. पद्मसिंहजी पाटील साहेबांनी पाटबंधारे खात्याच्या माध्यमातून केलेल्या कामामुळे वाघोली व परिसरात शेतीसाठी पाण्याची मोठी सोय झाली. त्यामुळेच वाघोली आज ऊसाचे भांडार म्हणून ओळखले जात आहे. साहेबांच्या विकासाचा हा वारसा आपण पुढे नेत आहोत. गावाच्या विकासासाठी गेल्या अडीच वर्षात भरपूर विकास निधी दिला आहे अशी माहिती राणा पाटील यांनी यावेळी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालया प्रश्न मार्गी लागला; राणाजगजितसिंह पाटील यांची प्रचार दौऱ्यात माहिती
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचे काम सुरु झाले आहे. जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा असलेला कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतिम टप्यात आहे. वर्ष अखेरीस पश्चिम महाराष्ट्रातील पाणी रामदरा तलावात येत आहे. कौडगाव एमआयडीसी यासह मतदार संघातील अनेक योजना प्रगतीपथावर आहेत. शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सातत्याने आपला पाठपुरावा राहिला आहे असंही ते म्हणाले.
महायुतीने अनेक प्रश्न मार्गी लावले
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनेच्या माध्यमातून महायुती सरकारने महिलांचा सन्मान केला आहे. मात्र, विरोधक या योजनेबद्दल अपप्रचार करत आहेत. ही योजना बंद होणार नाही कारण महायुती सरकारने पुरेशी तरतूद करून ठेवली आहे. महायुती पुन्हा सत्तेवर येणार असून या योजनेतील रक्कम वाढून मिळणार आहे.
जिल्ह्यातील मोठे प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी तसंच सरकारकडून आणखी विकास निधी खेचून आणण्यासाठी आपल्या आशीर्वाद आवश्यक आहे. त्यामुळे येत्या २० तारखेला कमळ चिन्हा समोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्क्याने विजयी करून पुन्हा एकदा सेवेची संधी द्यावी अशी विनंतीही राणा पाटील यांनी यावेळी केली.