UBT Split Sushma Andhare Challenge to Nagesh Aashtikrs son Krishna Ashtikar for prove with the Thackeray : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार फुटले आहेत. या खासदारांनी स्वतंत्र गट असल्याचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले आहेत. हे खासदार लवकरच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. या दरम्यान शुक्रवारी शिवसेनेता 60 वा वर्धापन दिन पार पडला. यामध्ये ठाकरे आणि शिंदेंच्या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. त्यामध्ये ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलाला ठाकरेंसोबत असल्याचं सिद्ध करण्याचं आव्हान दिलं.
नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा मुलगा कृष्णा अष्टीकर हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत असेल तर त्याने उद्या बापाचा पिंडदान करून दाखवावं. स्वतःच्या बापाच्या प्रतिमेला जोडे मारून दाखवावेत. मग आम्ही म्हणू की तुम्ही उद्धव ठाकरे सोबत आहात. तुम्ही कुणाला शहाणपणा शिकवताय? बाप तसा बेटा असं म्हणत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलाला ठाकरेंसोबत असल्याचं सिद्ध करण्याचं आव्हान दिलं.
