Uday Samant stated the government’s position : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना सध्या दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या वेळी या मदतीची रक्कम वाढवून 2,100 रुपये करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. आता याच आश्वासनाबाबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. योग्य वेळी लाडक्या बहिणींना दरमहा 2,100 रुपये दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना उदय सामंत यांनी ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याचे सांगितले. ही योजना 100 टक्के सुरू राहणार असून, महिलांच्या आरोग्यासाठी आणि आर्थिक गरजांसाठी त्यांना मिळणारे हे पैसे महत्त्वाचे आहेत, असे त्यांनी नमूद केले. महिलांना आर्थिक आधार देऊन त्यांना न्याय मिळवून देणे ही सरकारची भूमिका असल्याचेही सामंत म्हणाले.
महाराष्ट्रात दिवसा उन्हाचा चटका, रात्री थंडीचा कडाका! 29 नोव्हेंबरला तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं राहणार?
रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद (खंडाळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात उदय सामंत बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थित महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच लाडकी बहीण योजनेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करत निवडणुकीच्या वेळी दिलेले आश्वासन पूर्ण केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी 1,500 रुपयांची मासिक मदत वाढवून 2,100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे राज्यातील लाखो लाभार्थी महिलांना वाढीव आर्थिक मदतीची प्रतीक्षा आहे. मात्र, अद्याप या वाढीव रकमेची अंमलबजावणी झालेली नाही.
‘विसापूरचे आंदोलन शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी की राजकीय भवितव्यासाठी?’; विक्रम पाचपुतेंचा विरोधकांना सवाल
आता उदय सामंत यांनी पुन्हा एकदा 2,100 रुपये देण्याच्या आश्वासनाचा पुनरुच्चार केला आहे. विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द सरकार पाळणार असून, योग्य वेळी महिलांच्या खात्यात वाढीव रक्कम जमा केली जाईल, असे त्यांनी सांगितले. सरकारमधील नेत्यांकडून वारंवार 2,100 रुपये देण्याचे आश्वासन दिले जात असले, तरी प्रत्यक्षात ही वाढ कधी लागू होणार, याबाबत अद्याप कोणतीही निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम कायम आहे.
दरम्यान, उदय सामंत यांच्या या विधानामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अपेक्षा पुन्हा एकदा वाढल्या आहेत. मात्र, 1,500 रुपयांऐवजी 2,100 रुपयांचा लाभ नेमका कोणत्या महिन्यापासून मिळणार, याबाबत सरकार अधिकृत घोषणा कधी करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तोपर्यंत महिलांना वाढीव मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
