Download App

Uddhav Thackeray : तपास यंत्रणा स्वायत्त की सरकारच्या गुलाम.. ठाकरे गटाचा घणाघात

Uddhav Thackeray : दिल्ली पोलिसांच्या विशेषपथकाने गुरुवारी न्यूज क्लिक या (News Click Raid) वृत्तसंस्थेशी संबंधित पत्रकारांच्या घरी छापेमारी केली. या कारवाईवरून मोदी सरकारवर देशभरातून टीका होत आहे. आता ठाकरे गटानेही (Uddhav Thackeray) सामनातून याच मुद्द्यावर सरकारवर हल्लाबोल केला आहे. तपास यंत्रणा मोदी सरकारच्या गुलाम असल्याचे सांगत मोदी सरकारला फटकारले आहे.

सरकारी यंत्रणांचा गैरवापर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी करावा ही काही लोकशाही नाही. केंद्र सरकारने पत्रकारांवरील कारवाईचे समर्थन केले. तसे असेल तर भाजपन आणीबाणीचा निषेध करणे सोडले पाहिजे. तपास यंत्रणा स्वायत्त आणि स्वतंत्र असून आपले कायदेशीर कर्तव्य बजावत आहेत, असे केंद्रीय प्रसारणमंत्री अनुरान ठाकूर म्हणतात. तपास यंत्रणा स्वायत्त की सरकारच्या गुलाम हे संपूर्ण देश जाणतोय. ईडी सारख्या तपास यंत्रणांना सर्वोच्च न्यायालयाने बजावले आहे की निष्पक्ष रहा, सूडाने कारवाया करू नका. यातच सर्व आले. पत्रकारांवरील धाडी व कारवाया हे यंत्रणा निष्पक्ष असल्याचे लक्षण नसून सरकार घाबरल्याचे लक्षण आहे, अशी जळजळीत टीका ठाकरे गटाने केली आहे.

जेव्हा पक्ष सांगेल, तेव्हा मी नागपूरला जाईल; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

पंतप्रधान मोदी व त्यांच्या भाजपविरुद्ध बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारावर मंगळवारी दिल्ली येथे धाडी पडल्या. न्यूज क्लिक या वृत्त संकेतस्थळाचे संपादक प्रबीर पुरकायस्थ यांना तर अटक केली गेली. चीनधार्जिणा दुष्प्रचार चालविण्यासाठी बेकायदा आर्थिक मदत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर असून युएपीए म्हणजे बेकायदा कारवाया प्रतिबंधत कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

दहशतवाद्यांप्रमाणे पत्रकारांच्या घरांवर कारवाया

मंगळवारी मध्यरात्री 2 वाजल्यापासून या धाडी सुरू झाल्या. दहशतवाद्यांच्या अड्ड्यात घुसून कोम्बिंग ऑपरेशन करावे तशा पद्धतीने पोलिसांची पथके पत्रकारांच्या घरात घुसली. अनेक पत्रकारांवर छापे टाकून त्यांचे फोन, लॅपटॉप साहित्य जप्त केले. कम्युनिस्ट नेचे सिताराम येचुरी यांच्या घरीही पोलीस पोहोचले. येचुरी यांचे स्वीय सहाय्यक नारायणन यांचे चिरंजीव सुमित न्यूज क्लिकमध्ये कामाला आहेत. त्यामुळे येचुरी यांच्या घरावर छापे पडले. आणीबाणीत व्यक्तिस्वातंत्र्य, वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी झाली असे बोंबलणाऱ्यांच्या राज्यात वृत्तपत्र स्वातंत्र्य वधस्तंभावर चढवले असेच म्हणावे, अशी टीका या लेखात केली आहे.

कुणाच्याही गिधड धमक्यांना घाबरत नाही; नार्वेकरांचा आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

म्हणून सरकारला मिरच्या झोंबल्या

चार दिवसांपूर्वी मोदी सरकारविरोधात दिल्ली आणि आसपासच्या प्रदेशांतून लाखोंच्या संख्येने लोक जमले. रामलीला मैदानावर जनसागर उसळला. पण, या जनसागराचे म्हणणे काय ते काही भाजपाची चमचेगिरी करणाऱ्या मीडियाने दाखवले नाही. अशा गोदी मीडियाला समांतर असा बाणेदार मीडिया समाजमाध्यमातून उभा राहिला. त्याला लोकांनी पाठिंबा दिला तेव्हा सरकारला मिरच्या झोंबल्या.

follow us