बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ठाकरे कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. ठाकरे कुटूंबियांकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप करत गौरी भिडे यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. पण न्यायालयाने ठाकरे यांना दिलासा देत ही याचिका फेटाळून लावली आहे. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांचे उत्पन्नाचे स्रोत पहिले तर त्यांचे उत्पन्न आणि मालमत्ता यांच्यात साम्य दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी भिडे यांनी केली होती.
भिडे यांच्या याचिकेवरून राज्य सरकारनेही अर्थी गुन्हे शाखेकडून चौकशी करण्याची तयारी दरवेळी होती. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयामुळे ठाकरे यांना सध्या तरी दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात गौरी भिडे या सबळ पुरावे देऊ शकल्या नाहीत. असं मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. पण मुंबई हायकोर्टाच्या निकालाशी गौरी भिडे सहमत नाहीत, या निर्णयाला त्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत.
जीवे मारण्याच्या धमक्या, तानाजी सावंत यांचं ऑफिस जाळलं गेलं; शिंदे गटाकडून युक्तिवाद
न्यायालयाने ही याचिका फेटाळताना गौरी भिडे यांना 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर बेहिशेबी संपत्तीचा आरोप तक्रार करण्यात आलेली होती आणि न्यायालयातही यासंबंधित याचिका दाखल करण्यासाठी गौरी भिडे यांच्याकडून प्रयत्न सुरू होते. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.
भिडे यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर गौरी भिडे कोण आहेत असा प्रश्न विचारला गेला. तर गौरी भिडे या मुंबईतील प्रकाशक आहेत. ठाकरे यांच्या मालकीच्या सामना आणि मार्मिक प्रकाशित केले जात असलेल्या ‘प्रबोधन’ छापखान्या शेजारी गौरी भिडे यांच्या आजोबांचा ‘राजमुद्रा’ प्रकाशन हा छापखाना होता.