Uddhav Thackeray गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईरांच्या घरावर एसीबीचा छापा!

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईर (Yogesh Bhoir) यांच्या घरावर अँटी करप्शन ब्युरो (Anti Corruption Bureau) छापेमारी केली. ३ तास चाललेल्या छापेमारीत त्यांच्याकडे ८५ लाखांची अधिकची मालमत्ता सापडली असल्याने एसीबीने योगेश भोईर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मालाड, कांदिवली पूर्व येथील माजी नगरसेवक तसेच मागाठाणेचे उपविभाग प्रमुख […]

Yogesh Bhoir

Yogesh Bhoir

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईर (Yogesh Bhoir) यांच्या घरावर अँटी करप्शन ब्युरो (Anti Corruption Bureau) छापेमारी केली. ३ तास चाललेल्या छापेमारीत त्यांच्याकडे ८५ लाखांची अधिकची मालमत्ता सापडली असल्याने एसीबीने योगेश भोईर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मालाड, कांदिवली पूर्व येथील माजी नगरसेवक तसेच मागाठाणेचे उपविभाग प्रमुख योगेश भोईर यांनी ८५ लाख रुपयांची अधिकची संपत्ती जमवल्याचा एसीबीला संशय असल्याने त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे.

योगेश भोईर यांच्याविरुद्ध यापूर्वी डिसेंबर २०२२ ला समता नगर पोलीस ठाण्यात एका व्यावसायिकाकडून खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भोईर यांना अटक केली होती. तेव्हा एस. डी कॉर्प या कंपनीकडून २५ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप भोईर यांच्यावर करण्यात आला होता. भोईर यांच्यावर ३८६, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. योगेश भोईर यांच्या विरोधात २ डिसेंबरला गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात भीमसेन यादव या आरोपीला त्यापूर्वीच अटक केली होती. योगेश भोईर हे त्या खंडणी प्रकरणात सहआरोपी होते.

Ashok Chavan यांची ‘भगवी शाल’ सोशल मीडियावर व्हायरल!

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे योगेश भोईर यांना यापूर्वी डिसेंबर २०२२ मध्येही खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. तेव्हा त्यांच्या पत्नी माधुरी भोईर आक्रमक झाल्या होत्या. तेव्हा योगेश भोईर वकिलांसोबत जबाब नोंदवण्यासाठी गेले असता पोलीस स्टेशनला गेल्यानंतर वकिलांना आत घेतलं नव्हतं. तेव्हा माधुरी भोईर या पोलीस स्टेशनला गेल्या तेव्हा कोणीही बोलायला तयार नव्हतं. कोणत्या कारणामुळं अटक केली. कोणाचा दबाव आहे, असा सवाल माधुरी भोईर यांनी तेव्हा केला होता.

Exit mobile version