आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो होतो पण तुम्ही.., उद्धव ठाकरेंनी अमित शाहांनाच धरलं

छ. संभाजीनगर : आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो पण तुम्ही मिंधे गटाचे काय चाटत आहात? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहांवर टीकेची तोफ डागली आहे. महाविकास आघाडीच्या आजच्या वज्रमूठ सभेची अनेकांना उत्सुकता लागलेली असताना अखेर उद्धव ठाकरेंचं भाषण सुरु झालं आहे. या सभेत भाषणादरम्यान उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना चांगलंच झोडपलंय. या सभेला […]

Udhav Thackeray

Udhav Thackeray

छ. संभाजीनगर : आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो पण तुम्ही मिंधे गटाचे काय चाटत आहात? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहांवर टीकेची तोफ डागली आहे. महाविकास आघाडीच्या आजच्या वज्रमूठ सभेची अनेकांना उत्सुकता लागलेली असताना अखेर उद्धव ठाकरेंचं भाषण सुरु झालं आहे. या सभेत भाषणादरम्यान उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना चांगलंच झोडपलंय. या सभेला महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजप-शिंदे गटावर टार्गेट करण्यात आलं आहे.

‘अमृता’ नाव लकी, अमोल कोल्हे करणार अमृता खानविलकरसोबत लग्न? कोल्हेंनी शेअर केली पोस्ट

उद्धव ठाकरे म्हणाले, पुण्यात येऊन देशाचे केंद्रीय मंत्री अमित शाहा यांनी आम्हाला सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटत असल्याचं विधान केलं होतं. त्यांना सांगतो, मलाही बाळासाहेब ठाकरे यांची भाषा येते. पण ती भाषा त्यांनाच शोभते. आम्ही सत्तेसाठी राष्ट्रवादी, काँग्रेसचे तळवे चाटत आहे तर तुम्ही सत्तेसाठी मिंधेंचं काय चाटत आहात? असा संतप्त होत सवाल त्यांनी केला आहे.

Gulabrao Patil : आम्ही मोदी साहेबांवर विश्वास ठेवून आलो, नाही तर…; गुलाबराव भाजपवर भडकले

तसेच यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी औरंगाबादच्या नामांतरावरही भाष्य केलंय. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नामांतर महाविकास आघाडीने केलं असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच सत्ताधाऱ्यांकडून अनेकदा उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं असल्याचा सूर लगावला जात आहे. यावेळी विरोधकांचा सूरही उद्धव ठाकरेंनी खोडला असून मी हिंदुत्व सोडलं असल्याचं एक उदाहरण दाखवून द्या मी घरी बसेन, असा शब्दही त्यांनी यावेळी जनतेला दिला आहे.

राऊतांना धमकी देणारा व्यक्ती दारूच्या नशेत; धमकी प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया

सत्ताधाऱ्यांकडून घटनेचा अपमान केला जात आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, आणि ठाकरे गट सत्तेसाठी एकत्र आले पण आज सत्ता गेल्यानंतरही एकत्रच आहेत, आमची एकजूट आता मजबूत झाली आहे. छत्रपती संभाजीनगरच नामांतर जे आत्तापर्यंत कोणालाही नाही जमलं ते महाविकास आघाडीने करुन दाखवल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे.

IPL 2023: विजयासाठी गुजरातपुढे 179 धावांचे आव्हान

दरम्यान, महाविकास आघाडीच्या या सभेला काँग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे सर्वच आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली असल्याचं दिसून आलं आहे. खेड, मालेगावनंतर महाविकास आघाडीची ही सर्वात मोठी सभा झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रकृतीच्या कारणाने गैरहजर राहिल्याची माहिती समोर आली आहे.

एकीकडे शिंदे-फडणवीस सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्मानार्थ राज्यात सावरकर गौरवयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ही सावरकर गौरवयात्रा छत्रपती संभाजीनगरमध्येच दाखल झालेली असून सत्ताधाऱ्यांच्या सावरकर गौरवयात्रेला वज्रमूठ सभेतून विरोधकांकडून प्रत्यूत्तर दिलं जात असल्याचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

Exit mobile version