Download App

राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं सावट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेमध्ये वाढ झाली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांना काळजी घेण्याचं अवाहन देखील करण्यात आले आहे. पण याता यामध्ये पुन्हा एकदा राज्यावर अवकाळी पावसाचं सावट निर्माण झालं आहे. हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज 4 एप्रिलपासून ते 8 एप्रिलपर्यंत हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं सावट निर्माण होण्यामागे एक कारण हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि दक्षिण पूर्वेकडून वाहणारे वारे यांचा संयोग विदर्भापासून ते तामिळडूपर्यंत होत आहे. त्यामुळं या भागात द्रोणीय स्थिती म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

राज्यातील अनेक भागात हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. यामध्ये आज 4 एप्रिलला विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उद्या 4 एप्रिलला गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अवकाळीची नुकसान भरपाई महिनाभरात देणार कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा

त्याचबरोबर 6 एप्रिलला पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातही अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोलीसह 6 एप्रिलला विदर्भातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Tags

follow us