Bapu Pathare : राज्यातील राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार वडगावशेरीत भाजपला (BJP) मोठा धक्का देत बापू पठारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत बापू पठारे (Bapu Pathare) शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
माजी आमदार बापू पठारे यांच्यासह त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे आणि तीन माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओक येथे खा. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत माजी आमदार बापू पठारे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वडगावशेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे भाजपला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरु होती. तसेच त्यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना याबाबत संकेत देखील दिले होते. गेल्या दहा वर्षात या मतदारसंघात कोणतेही विकास कामे झालेली नाही. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही तसेच शासकीय रुग्णालयाचे काम आतापर्यंत पूर्ण झालेले नाही. त्यामुळे माझ्याकडे विधानसभा निवडणूक लढवण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे.
सर्व नेतेमंडळी माझ्या संपर्कात आहे परंतु येणाऱ्या काळात मी माझी भूमिका स्पष्ट करणार असं लेट्सअप मराठीशी बोलताना माजी आमदार बापू पठारे म्हणाले होते तसेच काही दिवसापूर्वी शरद पवार आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याशी माझी भेट झाली असून थोड्या दिवसात याबाबत निर्णय होणार असेही ते म्हणाले होते.
मोठी बातमी! वडगावशेरीत भाजपला धक्का, बापू पठारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल
.#bapupathare #ncp #NcpPune #WadgaonSheri pic.twitter.com/kagxJKYyIt— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) September 17, 2024
10 नगरसेवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार : बापूसाहेब पठारे
पुन्हा एकदा साहेबांचे विचार सोबत घेऊन त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळत आहे याचा आनंद आहे. आज काही प्रतिनिधी प्रवेश आम्ही केलेले आहेत मात्र खराडीमध्ये येत्या 27 तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीत मोठी सभा घेऊन शेकडो कार्यकर्त्यांसह जवळपास 10 नगरसेवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. मी वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवणारच आहे. मात्र साहेब योग्य निर्णय घेतील. अशी प्रतिक्रिया बापूसाहेब पठारे यांनी दिली आहे.
बापू पठारे मुळचे राष्ट्रवादीचे
बापू पठारे हे राष्ट्रवादीचे नगरसेवक राहिलेले आहे. त्यांनी महानगरपालिका स्थायी समितीचे सभापतीपद भूषविले आहे. तर 2009 ला वडगाव शेरी मतदारसंघातून ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजयी झाले होते. परंतु 2014 ला भाजपचे जगदीश मुळीक यांनी पठारे यांचा पराभव केला. पण 2019 ला पठारे यांना तिकीट मिळाले नाही.
… म्हणून बापू पठारे सोडणार भाजपची साथ, लेट्सअप मराठीशी बोलताना केला मोठा खुलासा
अजित पवार यांचे जवळचे असलेले सुनील टिंगरे यांना तिकीट मिळाले होते. त्यामुळे नाराज झालेले पठारे यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतरही टिंगरे हे विजयी झाले आहेत. पण विधानसभेला शरद पवार गटाकडून संधी मिळणार असल्याने बापू पठारे यांनी भाजपची साथ सोडली आहे.