Download App

आज गुन्हेगार म्हणून वापरला गेला..उद्या सामान्य माणसाचं काय? आंबेडकरांना वेगळाच संशय

आज गुन्हेगार आहे म्हणून वापरले गेले. उद्या सामान्य माणसाचं काय? पोलिसाला लागलेल्या गोळीचा मेडिकल रिपोर्ट पुढे आला पाहिजे.

Prakash Ambedkar : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने (Akshay Shinde Encounter) पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली. तर अक्षय शिंदेने केलेल्या गोळीबारानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. आरोपी अक्षय शिंदे याला ठाणे गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी घेऊन जात असताना हा प्रकार घडला. जीपमधून प्रवास करत असताना अक्षयने पोलिसांच रिव्हॉल्व्हर हिसकावले आणि पोलिसांनी प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला. या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. याशिवाय, गोळीबारात एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला.

या घटनेनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशीही तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणी आत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड.  प्रकाश आंबेडकर यांनी (Prakash Ambedkar) भाष्य केलं आहे. आज गुन्हेगार आहे म्हणून वापरले गेले,उद्या सामन्य माणसाचं काय असा प्रश्न निर्माण होईल असे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले.

जोपर्यंत लोक धर्मांतरण करत नाहीत, तोपर्यंत आरक्षण..; प्रकाश आंबेडकरांचे खळबळजनक विधान

बदलापूरमधील आरोपी (Badlapur Crime) आहे. तो गुन्हा सिद्ध झालं नाही. कायदा का फॉलो केला नाही. आपण म्हणतो कोर्टात घेऊन जा. कोर्टाला सांगू द्या की तो गुन्हेगार आहे. आज गुन्हेगार आहे म्हणून वापरले गेले. उद्या सामान्य माणसाचं काय असा प्रश्न निर्माण होईल. पोलिसाला लागलेल्या गोळीचा मेडिकल रिपोर्ट पुढे आला पाहिजे. मांडीला गोळी कशी लागली हा प्रश्न आहे. समोरून गोळी मारली तर मांडीला कशी लागली हे समोर यायला हवं.

अनेक प्रकार त्या शाळेत घडले आहेत आरोपी ते सगळे समोर आणणार होता का? अनेक संशय आहेत त्यामुळे मेडिकल रिपोर्ट आणि सायंकाळच्या सुमारास कुठे घेऊन चालले होते असा सवाल उपस्थित करू सरकारने वस्तुस्थिती समोर मांडवी अशी विनंती करतो. ज्यात संशय राहणार नाही असे अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

अक्षय शिंदेचा एन्काउंटर

सोमवारी संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास पोलीस अक्षय शिंदेला ट्रान्झिट (Akshay Shinde Encounter) रिमांडसाठी नेत होते. मात्र मुंब्रा बायपास येथे अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर 2 गोळ्या झाडल्या तेव्हा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवर तीन गोळ्या झाडल्या अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे गंभीर जखमी झाले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

follow us