केदारकंठा शिखरावर “वंदे मातरम्”चा निनाद; उणे 10 अंश तापमानात 12,500 फूट उंचीवर देशप्रेमाचा गौरव

Vande Mataram :  भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अमूल्य योगदान देणाऱ्या “वंदे मातरम्” या राष्ट्रगीताच्या 150 वर्षांच्या गौरवपूर्ण प्रवासानिमित्त

Vande Mataram

Vande Mataram

Vande Mataram :  भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अमूल्य योगदान देणाऱ्या “वंदे मातरम्” या राष्ट्रगीताच्या 150 वर्षांच्या गौरवपूर्ण प्रवासानिमित्त तसेच 77 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत हिमालयाच्या कुशीत असलेल्या केदारकंठा शिखरावर विशेष देशभक्तीपर उपक्रम राबवण्यात आला. सुमारे 12,500 फूट उंचीवर, उणे 8 ते 10 अंश सेल्सिअस तापमान, खडी व कठीण चढाई आणि वेगाने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांना सामोरे जात ट्रेकर्सनी केदारकंठा शिखर गाठले. या प्रतिकूल परिस्थितीत “वंदे मातरम्”चा निनाद करत देशप्रेमाचा अभिमानास्पद क्षण अनुभवण्यात आला.

या मोहिमेदरम्यान घसरणाऱ्या वाटा, तीव्र थंडी आणि कठीण हवामान असूनही सर्व सहभागी ट्रेकर्सनी अदम्य इच्छाशक्ती, शिस्त आणि संघभावनेच्या जोरावर यशस्वीपणे शिखर सर केले. Flag Code of India मधील सर्व नियमांचे काटेकोर पालन करत एकूण 76 भारतीय राष्ट्रध्वजांचे अत्यंत सन्मानाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने प्रदर्शन करण्यात आले. राष्ट्रध्वजाचा मान, प्रतिष्ठा आणि गौरव अबाधित ठेवण्यात आला. या अभिमानास्पद मोहिमेत देशभरातून एकूण 12 ट्रेकर्स सहभागी झाले होते. यामध्ये जयपूर येथील 5, सुरत येथील 1, आसाम येथील 1 तसेच महाराष्ट्रातील 5 गिर्यारोहकांचा समावेश होता.

मुंबई येथील आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक व मार्गदर्शक वैभव ऐवळे यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या 11 वर्षांची हृदया चव्हाण हिने या कठीण परिस्थितीत केदारकंठा शिखरावर भारतीय राष्ट्रध्वज फडकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उणे तापमान, वेगवान वारे आणि कठीण चढाई असूनही तिचे धैर्य व आत्मविश्वास उपस्थितांसाठी विशेष प्रेरणादायी ठरले. या मोहिमेत अमित चव्हाण, पूर्वांका वेतोस्कर, हृदया चव्हाण (वय 11 वर्षे), आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक व मार्गदर्शक वैभव ऐवळे आणि रेश्मा यांचा सहभाग होता.

समर्थांच्या चळवळीचे सामर्थ्य सावरकरांनी दाखवून दिले, अभिनेते शरद पोंक्षे

विशेषतः हृदया चव्हाण हिचा सहभाग पुढील पिढीत देशप्रेम, राष्ट्रध्वजाविषयी आदर आणि राष्ट्रीय मूल्यांची जाणीव रुजत असल्याचे प्रभावी उदाहरण ठरला. तर वैभव ऐवळे यांच्या अनुभवी नेतृत्वामुळे ही मोहीम सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी ठरली. केदारकंठाच्या शिखरावर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांत “वंदे मातरम्”चे सूर घुमत असताना तो क्षण केवळ एक उपक्रम नव्हता, तर देशप्रेम, एकता आणि राष्ट्रभक्तीची जिवंत अनुभूती होता—जो प्रत्येक सहभागींसाठी आयुष्यभर प्रेरणा देणारा ठरला.

Exit mobile version