Actress Smriti Vishwas Narang passed away : एकेकाळी आपल्या कामाने बॉलीवूड गाजवणाऱ्या, अभिनेत्री स्मृती विश्वास नारंग यांचं काल बुधवार रात्री त्यांच्या नाशिक रोडच्या चव्हाण मळ्यातील राहत्या घरी निधन झालं. (Smriti Vishwas) त्या 101 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुलं आणि एक बहीण आहे. (Actress) त्यांची अंत्ययात्रा आज गुरुवार सकाळी आठ वाजता चव्हाण मळ्यातील त्यांच्या घरापासून निघणार असून सारडा सर्कल जवळील ख्रिस्ती स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
नामवंत अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम
स्मृती विश्वास यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1924 रोजी बांगलादेशातील ढाकाजवळील भरोसापूर येथे झाला होता. त्यांचे पती डॉक्टर एस. डी. नारंग हे जागतिक कीर्तीचे चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांच्यासोबत त्यांनी 37 चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी आजपर्यंत 92 हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लाहोर, कोलकाता, मुंबई, दिल्ली या ठिकाणी चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली. बॉलीवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून स्मृति विश्वास -नारंग यांचा उल्लेख केला जात असायचा. त्यांना आजपर्यंत अनेक नामवंत पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. राज कपूर, राज बब्बर, सुनील दत्त, हेमामालिनी, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, जितेंद्र, प्राण अशा नामवंत अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केलं. त्यांची अनेक गाणेही लोकप्रिय झाली.
विकली होती ३ गाणी Munjya जेव्हा माझ्यामध्ये येत होता तेव्हा… शर्वरीने सांगितला थरारक अनुभव
स्मृती यांचे पती एस. डी. नारंग यांनी १९८५ ते ८७ या कालावधीत अनुराधा पौडवाल आणि बप्पी लहरी यांच्या आवाजात वैष्णोदेवी आणि प्रेम गीत गाऊन घेतले होते. काही कारणास्तव हा चित्रपट पूर्ण झाला नाही. मात्र, या गाण्याचे सर्व हक्क स्मृती विश्वास यांच्याकडे होती. जुलै २०२३ मध्ये उदरनिर्वाहासाठी पंधरा हजार रुपयात तीन गाणे विकावी लागली होती. स्मृती विश्वास यांची दोन्ही मुलं अविवाहित असून नाशिकमध्ये भाडेतत्त्वावर घेतलेल्या खोलीत ते राहतात. आईच्या उदरनिर्वाहासाठी ही गाणी विकावी लागली, अशी खंत त्यांच्या मुलांनी बोलून दाखवली होती.
कोलकात्यात गेल्या Tu Bhetashi Navyane एआयच्या माध्यमातून खुलणार अनोखी प्रेमकहाणी
नारंग यांचा १९३० मध्ये प्रदर्शित झालेला संध्या हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात स्मृती विश्वास यांनी बालकलाकार म्हणून काम केलं होतं. १९४० च्या सुमारास त्या लाहोर येथे गेल्या. त्यावेळचे प्रसिद्ध दिग्दर्शक – निर्माते दलसूख पांचोली यांनी ‘धमकी’ या चित्रपटात त्यांना संधी दिली. १९४३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. एस.डी. नारंग दिग्दर्शित नई भाभी (१९४४) या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. फाळणीनंतर स्मृती विश्वास या कोलकात्यात गेल्या. कोलकात्यात त्यांनी निरक्षर, अनुराग, अबू हसन अशा बंगाली चित्रपटांमध्ये काम केलं.
मुंबईत अल्यावर दिग्गजांसोबत काम
वयाची चाळीशी गाठत असताना स्मृती मुंबईत आल्या. यानंतर त्यांनी बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकांरासोबत काम केलं. चांदनी चौक (१९५४), राज कन्या (१९५५), बाप रे बाप (१९५५), जागते रहो (१९५६), सैलाब (१९५६), मॉडर्न गर्ल (१९६१) या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या.