Congress Maharally : आज देशाची लोकशाही व्यवस्था धोक्यात आली आहे. केंद्रातील भाजपचे (BJP) उद्योगपती धार्जिणं सरकार शेतकरी, कामगार तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून त्यांना संपवण्याचा घाट घालत आहे. त्यामुळं आता देशाची लोकतांत्रिक व्यवस्था टिकवण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे. महात्मा गांधींजींनी जसं चले जाव आंदोलन करून इंग्रजांना देश सोडायला भाग पाडलं, तसं राहुल गांधींच्या नेतृत्वात भाजपच्या तानाशाही सरकारला घरी पाठवू, अशा शब्दात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना (Nana Patole) भाजपवर टीका केली.
रामराजे निंबाळकर-मोहिते पाटलांची ‘टाईट फिल्डिंग’; माढ्यात रणजितसिंहांचा गेम होणार?
काँग्रेस आज आपला 139 वा स्थापना दिवस नागपुरात साजरा करत आहे. है तैयार हम या महारॅलीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनीहीह या महारॅलीला हजेरी लावली. या महारॅलीला संबोधित करतांना पटोलेंनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले, शाहु-फुले-आंबेडकरांच्या भूमित कॉंग्रेसचा वर्धापन दिन होत आहे. कारण कॉंग्रेसची विचारधारा ही शाहू -विचारांचींच आहे. तानाशाही प्रवृत्तीच्या इंग्रजांना देश सोडायला भाग पाडण्यात कॉंग्रेसची मोठी भूमिका होती. 1920 मध्ये महात्मा गांधींनी तानाशाह इंग्रज सरकारच्या विरोधात याच भूमितून आंदोलन केलं होतं. त्यामुळं दिडशे वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांना देश सोडून जावं लागलं. आता तानाशाही प्रवृत्तीच्या भापजला सत्तेत बाहेर काढण्यासाठी कॉंग्रेस प्रयत्नशील आहे, असं पटोले म्हणाले.
शेतकऱ्यांना संपवण्याचं काम भाजप करतेय
यावेळी देशातील सद्यस्थितीवरूनही भाजपवर टीका केली. ते म्हणाले, कॉंग्रेसची ओळख इंदिरा गांधी आहे. इंदिरा गांधींनी पंतप्रधान झाल्यावर देशात हरित क्रांती, श्वेत क्रांती आणली. त्यांना देशाला महासत्ता बनललं. मात्र गेल्या काही वर्षात देशाची अवस्था बिकट झाली. शेतकऱ्यांना संपवण्याचं काम भाजप करत आहे. देशातील तरुणांच्या हाताला रोजगार नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं प्रत्येक घटक संकटात सापडला आहे, अशी टीका पटोलेंनी केली.
देशाला वाचवण्यासाठी काँग्रेसची लढाई
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींनी चले जाव हा लढा उभारला. त्यामुळं जुलमी आणि तानाशाह प्रवृत्तीच्या इंग्रजांना देश सोडून जावं लागलं. आता लोकशाही आणि संविधान संपण्याचं काम भाजपकडून केलं जातं. या देशाचं संविधान, लोकशाही, तिरंगा वाचवण्याचं काम कॉंग्रेस करेलं. कठीण परिस्थितीतून जात असलेल्या देशाला वाचवण्यासाठी काँग्रेसची ही लढाई आहे.