नागपूर पदवीधर : फडणवीस जुना गड काँग्रेसकडून हिसकाविणार ?

Nagpur Graduates Constituency Election : हा मतदारसंघ 1978 ते 2020 पर्यंत जनसंघाच्या ताब्यात राहिलेला आहे. 1978 मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे वडिल गंगाधरराव फडणवीस हे या मतदारसंघातून निवडून आले होते.

Devendra Fadanvis

Devendra Fadanvis

Nagpur Graduates Constituency Election : नागपूर भाजपचा (BJP) गड आहे. सध्या महानगरपालिका, खासदार, सर्वाधिक आमदार भाजपचे आहेत. आता नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता. पण गेल्यावेळेस काँग्रेसने (Congress) हा बालेकिल्ला हिसकावला होता. आता ही जागा पुन्हा जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. या जागेसाठी भाजप कोण दावेदार आहेत. ही जागा भाजपसाठी काय महत्त्वाची आहे. काँग्रेसकडून कोण रिंगणात उतरणार हेच पाहुया.


सहा जिल्ह्यांचा मतदारसंघ, वर्चस्व भाजपचे पण काँग्रेसकडून धक्का

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात सहा जिल्हे येतात. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. 1978 पासून भाजप आणि त्यापूर्वीच्या जनसंघाचे वर्चस्व राहिलंय. मात्र, 2020च्या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भाजपचे संदीप जोशी यांचा पराभव करत भाजपला मोठा धक्का दिला होता. पण आता समीकरण बदललेली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हा मतदारसंघ कुठलाही परिस्थिती पुन्हा खेचून आणावा लागणार आहे.

अखेर 18 तासांनंतर भिंगारच्या गणरायांचे विसर्जन होणार! आमदार जगताप अन् पोलिसांच्या बैठकीनंतर तिढा सुटला

फडणवीस ते गडकरींकडून प्रतिनिधीत्व
हा मतदारसंघ 1978 ते 2020 पर्यंत जनसंघाच्या ताब्यात राहिलेला आहे. 1978 मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे वडिल गंगाधरराव फडणवीस हे या मतदारसंघातून निवडून आले होते. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे तब्बल तीनवेळा या मतदारसंघातून विधानपरिषदेवर आलेले आहेत. 1990, 1996, 2002, 2008 असे सलग चारवेळा गडकरी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. 2002 मध्ये गडकरी हे बिनविरोध झाले होते. 2008 मध्ये मात्र गडकरी यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीने बबनराव तायवडे यांच्या रुपाने तगडा उमेदवार दिला होता. परंतु गडकरी यांनी विजय मिळवत आपले वर्चस्व अबाधित ठेवले होते. पुढे 2014 ला गडकरी लोकसभेला निवडून आल्याने त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यातून येथून अनिल सोले ही विजयी झाले होते. त्यावेळी काँग्रेसचे बबन तायवाडे आमि सोले यांच्यात मतदान झाले होते.

आमच्याकडे पुरावे, देशद्रोह्यांना शिक्षा मिळणारचं, निवडणूक आयोगाच्या वादावरून राहुल गांधी मोदी-शहांना घेरलं


फडणवीस-गडकरींच्या वादात बालेकिल्ला काँग्रेसने हिसकावला

2020 ची पदवीधर निवडणूक मात्र एेतिहासिक ठरली. काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भाजपचे संदीप जोशी यांचा पराभव केला होता. तब्बल 50 वर्षानंतर काँग्रेसला भाजपचा गड हिसकावता आला होता. पण नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्यातील वादाचा फटका भाजपला बसला होता. अनिल सोले हे गडकरी गटाचे होते. त्यांना भाजपकडून पुन्हा उमेदवारी मिळेल, असे वाटत होते. पण फडणवीस यांच्या जवळचे संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली होती. या दोन्ही गटातील वादामुळे ही जागा भाजपने गमविले होते, असे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपने पुन्हा हा गड जिंकण्यासाठी कंबर कसलीय.


अभिजित वंजारीविरुद्ध भाजपकडून कोण ?

काँग्रेसकडून पुन्हा अभिजित वंजारी यांना उमेदवारी नक्की मानली जात आहे. भाजपकडून मात्र अनेक जण इच्छुक आहेत. माजी आमदार सुधाकर कोबहळे, माजी आमदार अनिल सोले, सुधीर दिवे या तिघांमध्ये उमेदवारीसाठी चुरस आहे. हा गड पुन्हा मिळविण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी फिल्डिंग लावलेली आहे.

Exit mobile version