Nagpur MLC Result : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार नितेश कराळे मास्तर यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आक्षेप घेतले आहेत. आपल्या उमेदवारीमुळे दोन मोठ्या राजकीय पक्षांना घाम फुटल्याचा दावा त्यांनी केला आहे. मतदारांकडून फोन आणि मेसेजद्वारे पाठिंबा मिळत असल्याचे सांगत, पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये ४० ते ४५ हजार किंवा ७५ हजारांहून अधिक मते मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दुसऱ्या पसंतीच्या मतांवरही त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
साई पल्लवीचा नवा अवतार, खाकीचा जबरदस्त दरारा! ‘ओम: चैप्टर 1’ मध्ये आईपीएस नित्या रेड्डीची झलक
दुसरीकडे, मतदान केंद्रांवरील १५ सीसीटीव्ही कॅमेरे दीड तास बंद असल्याचा आरोप करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कॅमेरे बंद असताना मतपेट्या बदलण्याची किंवा अन्य गैरप्रकार होण्याची शक्यता असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. संबंधित यंत्रणेने याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार किंवा हलगर्जीपणा आढळल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही कराळे यांनी दिला आहे. तसेच, निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी गरज पडल्यास मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक केवळ भाजप आणि काँग्रेसमधील लढतीपुरती मर्यादित राहिलेली नाही. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार नितेश कराळे मास्तर यांच्या भूमिकेनेही राजकीय गणितं बदलण्याची शक्यता निर्माण केली आहे. एकीकडे भाजपचा अंतर्गत सर्व्हे कराळे यांना पहिल्या पसंतीची 15 हजार मतं मिळण्याचा अंदाज वर्तवत असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे मतदानाच्या काही तास आधी कराळे यांनी सोशल मीडियावर ढसाढसा रडतानाचा व्हिडीओ शेअर केला. या दोन घटनांमुळे नागपूरच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
नितेश कराळे यांच्या उमेदवारीभोवतीचा वादही या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरला. मतदानाच्या काही तास आधी शरद पवार गटाने त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले. या निर्णयानंतर कराळे यांनी सोशल मीडियावर रडतानाचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओतून त्यांनी व्यक्त केलेल्या भावना आणि पक्षाच्या निर्णयामुळे निर्माण झालेला वाद याची चर्चा सुरू झाली. निवडणुकीच्या अगदी तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे कराळे यांच्याबद्दल मतदारांमध्ये सहानुभूती निर्माण झाली का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
