Download App

PM मोदींच्या सेल्फी बूथसाठीच्या खर्चाची माहिती दिल्यानं रेल्वे अधिकाऱ्याची बदली, कॉंग्रेसचा आरोप

  • Written By: Last Updated:

नागपूर : मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे (Shivraj Manaspure) यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांनी रेल्वे स्थानकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या थ्रीडी सेल्फी बूथ (3D Selfie Booth) आणि थ्रीडी सेल्फी पॉइंट्सच्या खर्चाची माहिती माहिती एका आरटीआय प्रश्नाला दिल्यानं त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. विशेष म्हणजे नुकताच त्यांचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. असे असतानाही त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली केल्यानं अधिकाऱ्यांच्या वर्तुळात चर्चा रंगली आहे.

VIDEO : देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत होती न्यायालयात सांगायचं… ‘बाबरी’च्या दाव्यावरुन ओवैसींचा हल्लाबोल 

रेल्वेने विविध विभागांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘3D सेल्फी बूथ’ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘3D सेल्फी पॉइंट’ स्थापित केले आहेत. मध्य रेल्वेच्या 50 स्थानकांवर यासाठी 1.25 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. या माहितीच्या आधारे विरोधी पक्षांनी सोशल मीडियावर निषेध व्यक्त केला. ही माहिती मानसपुरे यांनी दिली असून त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे.

Main Atal Hoon: पंकज त्रिपाठीच्या ‘मैं अटल हूं’ मधील ‘राम धून’ गाण्याचा धमाकेदार टीजर लाँच 

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील सामाजिक कार्यकर्ते अजय बोस यांनी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, दक्षिण रेल्वे, उत्तर रेल्वे आणि उत्तर पश्चिम रेल्वे या पाच झोनमध्ये आरटीआय अर्ज दाखल करून असे पीएम सेल्फी पॉइंट उभारण्यासाठी खर्च केलेल्या रकमेची माहिती मागितली होती. 2011 च्या बॅचचे IRTS अधिकारी मानसपुरे यांनी मे महिन्यात CPRO म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यानंतर बोस यांनी माहिती अधिकारात थ्रीडी सेल्फी बूथ आणि थ्रीडी सेल्फी पॉइंट्सच्या खर्चाची माहिती मागितली. डिसेंबरमध्ये, बोस यांना 3D बूथच्या संख्येबद्दल रेल्वे विभागांकडून स्वतंत्र उत्तरे मिळाली होती. मध्य रेल्वे वगळता, तात्पुरते आणि कायमस्वरूपी बूथ उभारण्यासाठी किती खर्च आला या प्रश्नाचे उत्तर कोणत्याही विभागाने दिले नाही. अनेक विभागांनी प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत.

बोस यांना उत्तरात काय माहिती मिळाली?
मध्य रेल्वेने सांगितले की, नागपूर, मुंबई, पुणे, भुसावळ आणि सोलापूर या पाच विभागांमधील 30 स्थानकांवर तात्पुरते सेल्फी बूथ आणि 20 स्थानकांवर कायमस्वरूपी सेल्फी बूथ स्थापित करण्यात आले आहेत. श्रेणी A स्थानकावरील प्रत्येक तात्पुरत्या बूथची किंमत ₹1.25 लाख होती आणि श्रेणी C स्थानकांवर, जेथे कायमस्वरूपी बूथ स्थापित केले गेले होते, खर्च ₹6.25 लाख (कर वगळून) होता. सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशनने या खर्चाला मान्यता दिली.

दरम्यान, मानसपुरे यांच्या बदलीच्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते बोस म्हणाले, “मध्य रेल्वेकडून माहिती उपमहाव्यवस्थापक (पीआयओ-मुख्यालय) अभय मिश्रा यांनी पुरवली होती, परंतु सीपीआरओला दूर करण्यात आले आहे.

तर मानसपुरे यांची बदली आरटीआयच्या उत्तराशी निगडीत असल्याचे निला यांनी नाकारले. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी हा ‘उच्च-स्तरीय निर्णय’ असल्याचे सांगून भाष्य करण्यास नकार दिला.

follow us

वेब स्टोरीज