Sudhir Mungantiwar : यंदा देशात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी आपल्याला उमेदवारी कशी मिळेल, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे देखील यंदा लोकसभा निवडणुक लढतील, अशी चर्चा सुरू आहे. यावर आता खुद्द मुनगंटीवर यांनी भाष्य केलं.
शरद मोहोळ कारागृहात असतानाच बिनविरोध उपसरपंच झाला होता….
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला चंद्रपूर लोकसभा जिंकता आली नाही. त्यामुळे भाजपने या जागेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या मिशन 45 घर चलो अभियानाला चंद्रपूरमधून सुरुवात झाली होती. त्यामुळे चंद्रपूर लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार कोण? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून काही आमदारांना आणि राज्यसभा खासदारांना रिंगणात उतरवण्याची चर्चा आहे.
नौदलाची मोहिम फत्ते; MV Lila नॉरफॉक जहाजात अडकलेल्या 15 भारतीयांची सुटका
दरम्यान, याच चर्चेवरून सुधीर मुनगंटीवार यांच्याही नावाचा लोकसभेसाठी विचार सुरू आहे का? असा सवाल माध्यमांनी मुनगंटीवार यांना विचारला. त्यावर बोलतांना मुनगंटीवार यांनी सांगितल की, राज्यसभेतील खासदार लोकसभेत उतरणार का याबद्दल मला माहिती नाही. माझ्याही नावाची चर्चा असेल तरीही मला त्याबद्दल माहिती नाही. नाव आहे चर्चेत. तुम्ही चर्चा सुरू ठेवताय. मात्र यात काहीही तथ्य नाही. मी महाराष्ट्रातच राहणार आहे. कराण, दिल्लीत थंडी खूप असते आणि माझ्याकडे स्वेटर नाही, त्यामुळे मला दिल्लीत जायचं नाही, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
राज्यातील सत्तासमीकरणं लक्षात घेता जास्तीत जास्त जागा कशा निवडून आणता येतील, यासाठीची रणनीती तयार करण्यात आली आहे. मोदी लाट-2 मध्ये भाजपला महाराष्ट्रात मोठे यश मिळाले, मात्र चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार पराभूत झाला. काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी भाजपचे हंसराज अहिर यांचा पराभव करून विजय मिळवला. या एका जागेमुळे महाराष्ट्राला काँग्रेसमुक्त करण्याचे भाजपचं स्वप्न धुळीस मिळाले. मात्र, यावेळी चंद्रपूरमधून भाजपची जागा निवडून आणण्यासाठी भाजपने फिल्डिंग लावली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदार संघातून कोणाला उमेदवारी मिळते, हेच पाहणं महत्वाचं आहे.