Chandrashekhar Bawankule on Farmer Loan : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शेतकरी कर्जमाफीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मंत्री बावनकुळे काल वर्ध्यात होते. यावेळी त्यांनी येथील एका कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या शेतावर जाण्यासाठी रस्ता आणि विजेची सोय आवश्यक आहे. येत्या पाच वर्षांत या सोयी उपलब्ध करुन देऊ. यासोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफीही देऊ असे संकेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
वर्ध्यातील आजनसरा येथे भोजाजी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात उपस्थित भाविकांशी बोलताना बावनकुळे यांनी कर्जमाफीचे संकेत दिले यावेळी आमदार समीर कुणावार, माजी खासदार रामदास तडस, माजी खासदार सुरेश वाघमारे, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट उपस्थित होते.
आम्ही जो वचननामा दिला होता त्यानुसारच आम्ही काम करत आहोत. दिलेलं प्रत्येक आश्वासन पूर्ण करत आहोत. शेतकऱ्यांच्या शेतावर जाण्यासाठी रस्ता आणि विजेची सोय आवश्यक आहे. येत्या पाच वर्षांत या सोयी उपलब्ध करुन देऊ. यासोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफीही देऊ असे संकेत बावनकुळे यांनी यावेळी दिले. भोजाजी महाराजांचे आजनसरा हे तीर्थक्षेत्र लवकरच ब वर्ग तीर्थक्षेत्र होईल. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यासंदर्भात पर्यटन आणि ग्रामविकास मंत्र्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री, चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान
दीड लाखांपेक्षा जास्त भाविक दरवर्षी आजनसरा येथे येतात. त्यामुळे आजनसराचा विकास करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. रस्ते, पाणी, वीज यांसारख्या आवश्यक सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची आहे असेही बावनकुळे म्हणाले.