Video : एका झटक्यात पूर्ण पाकिस्तान संपवून टाका, हत्यारं संपली तर वर्गणी…; जरांगेंनीही दंड थोपटले

जालना : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे भारताकडून या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी हालचालींना वेग आलेला असतानाच आता मराठा आरक्षणासाठी मैदान गाजवणारे मनोज जरांगेंनीही (Manoj Jarange) या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आह. तसेच भारतीय लष्कराच्या मदतीसाठी पुढाकार घेण्यासाठी दंड थोपटले आहेत. ते पत्रकार परिषदेत […]

Letsupp Image   2025 04 30T114553.430

Letsupp Image 2025 04 30T114553.430

जालना : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे भारताकडून या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी हालचालींना वेग आलेला असतानाच आता मराठा आरक्षणासाठी मैदान गाजवणारे मनोज जरांगेंनीही (Manoj Jarange) या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आह. तसेच भारतीय लष्कराच्या मदतीसाठी पुढाकार घेण्यासाठी दंड थोपटले आहेत. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Manoj Jarange On Pahalgam Terroris Attack)

नुसते हत्यारं दाखवू नका…

पहलगाम हल्ल्यावर भाष्य करताना जरांगे पाटील म्हणाले की, भारतानं शेजारी राष्ट्र असणाऱ्या आणि दहशतवादाला खत-पाणी घालणाऱ्या पाकिस्तानला नुसती हत्यारं दाखवू नये तर, मोठं मोठे बॉम्ब गोळे कचाकच टाकून एका झटक्यात पूर्ण पाकिस्तान संपून टाकला पाहिजे.
नुसते बॉम्बे दाखवला ठेवू नका त्याचा उपयोग कधी करणार असा प्रश्न उपस्थित करत जर, हत्यारं संपली तर, आम्ही वर्गणी करून हत्यारं घ्यायला पैसे देऊ असेही जरांगेंनी म्हटले आहे.

सैन्याने वेळ आणि टार्गेट ठरवावे – मोदी 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता केंद्र सरकार देखील पाकिस्तानावर सैन्य कारवाई करण्याची तयारी करत आहे. काल (दि.29) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय बैठक पार पडली ज्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह , राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल (Ajit Doval) आणि संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान आणि लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी (आणि नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी उपस्थित होते. या बैठकीत मोदींनी दहशतवादाला योग्य धडा शिकवणे हा आपला राष्ट्रीय संकल्प आहे. भारतीय लष्कराने हल्ल्याची पद्धत आणि वेळ ठरवावी यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

27 पर्यटकांचा मृत्यू

22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्या पाठीमागे पाकिस्तानचा हात असल्याची माहिती सरकारला मिळाल्याने भारत सरकार पाकिस्तानविरुद्ध भारत अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. भारत सरकारने पाकिस्तानावर मोठी कारवाई करत सिंधू जल करार रद्द केला आहे. तसेच सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देखील दिले आहे.

Exit mobile version