Video : दादांनी घेतलेले निर्णय दादांसोबतच गेले; सुप्रिया सुळेंचा विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम?

Supria Sule माझ्या भावाचं आणि माझं जे काय बोलणं होतं ते दादाच्या आणि माझ्यामध्ये आहे, आणि ते वास्तव आहे आणि ते बऱ्याच लोकांना माहिती आहे.

Video : दादांनी घेतलेले निर्णय दादांसोबतच गेले; सुप्रिया सुळेंचा विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम?

Video : दादांनी घेतलेले निर्णय दादांसोबतच गेले; सुप्रिया सुळेंचा विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम?

Supria Sule On Both NCP Merger : अजितदादांच्या अकाली निधनाच्या धक्क्यातून अजूनही संपूर्ण महाराष्ट्र सावरलेला नसताना खासदार सुप्रिया सुळे यांनी काळीज पिळवटून टाकणारे विधान केले आहे. “दादांनी घेतलेले निर्णय दादांसोबत गेले. माझा भाऊ राहिला नाही, आता त्या चर्चांना काही अर्थ उरत नसल्याचे सुळे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे. पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहारावरही भाष्य केले.

दादांसोबतचं बोलणं वास्तव आहे

दादांनी घेतलेले निर्णय दादांसोबत गेले असे सुळे यांनी आज जरी म्हटले असले तरी, काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर भाष्य केले होते. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, माझ्या भावाचं आणि माझं जे काय बोलणं होतं ते दादाच्या आणि माझ्यामध्ये आहे, आणि ते वास्तव आहे. आणि ते बऱ्याच लोकांना माहिती आहे. या गोष्टी आयुष्यात होत असतात अनेक वेळा. आज दादा नाही त्याच्यामुळे मला काही जुनं उणं धुणं काढत बसायचं नाही. तो माझा मोठा भाऊ होता, माझा दादा होता आणि माझ्या दादामध्ये आणि काय जी चर्चा झाली ती माझ्या भावाला माहिती आहे पण आज माझा भाऊ जिथे असेल तिथे त्याला ते माहिती आहे. त्यामुळे दादाची इच्छा आणि आशीर्वादाने जे होईल ते पुढे पुढे बघूया असे सुळे बोलल्या होत्या. त्यानंतर आता त्यांनी “दादांनी घेतलेले निर्णय दादांसोबत गेले. माझा भाऊ राहिला नाही, आता त्या चर्चांना काही अर्थ उरत नसल्याचे सुळे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे.

पार्थ पवार प्रकरणावरही भाष्य 

यावेळी सुळे यांनी पार्थ पवार प्रकरणात दोन अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईबाबत विचारण्यात आले. त्यावर त्या म्हणाल्या की, पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केल्याप्रकरणी जमीन प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या महसूल सचिव विकास खारगे समितीचा अहवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सोमवारी सादर करण्यात आला. यात पार्थ पवार यांना अभय देण्यात आल्याचे तर, या व्यवहारासाठी मदत करणार्‍या दोन सरकारी अधिकार्‍यांच्या विरोधात कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, हा अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे सूत्रांच्या अहवालांवर मी बोलणार नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून असे अहवाल प्रत्यक्षात वाचल्याशिवाय मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. असे अहवाल गोपनीय असतात, त्यामुळे ते बाहेर येत नाहीत आणि जर अहवाल प्रसिद्ध झाले तर ते वाचल्याशिवाय प्रतिक्रिया देत नसल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले. हे प्रकरण बाहेर आल्यानंतर मी पार्थला फोन केला होता. तेव्हा त्याने मला सांगितलेलं आत्या मी काही चुकीचं केलेलं नाही. मी नंतर तुला समजावून सांगतो. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. मला वाटतं चौकशीचा कागद येईपर्यंत थांबलं पाहिजे असेही सुळे म्हणाल्या.

 

Exit mobile version