Vijay Wadettiwar On Nagpur Violence: औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी या मागणीसाठी राज्यातील अनेक शहरात आंदोलन होत आहे. नागपूर शहरात देखील या मागणीसाठी बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेकडून (VHP) आंदोलन करण्यात आला होता मात्र या आंदोलनाला हिंसक वळण मिळाला असून शहरातील महाल भागात सोमवारी रात्री दोन गटात राडा झाला. या राड्यात पोलिसांवर दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली तसेच खाजगी मालमत्तेला नुकसान पोहचवण्यात आला.
तर दुसरीकडे या प्रकरणावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून सरकारवर हल्लाबोल करण्यात येत आहे. आज माध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
माध्यमांशी बोलताना आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, नागपूरचा विषय सरकारचं अपयश आहे. नागपूरमध्ये या आधी कधीही असा उद्रेक झाला नव्हता. आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार तुमचं आहे. काढून टाका कबरी मात्र या सरकारचा हा वाद चिघळत ठेवण्याचं काम सुरू आहे असं या माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले. तसेच घटनास्थळी पोलीस वेळेत का गेले नाही ? याची देखील चैकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. जर योग्य वेळी ते आंदोलन थांबवलं असतं तर हे घडलचं नसतं असं देखील त्यांनी या वेळी बोलून दाखवलं.
माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी तेलगणा भाजप आमदार टी. राजावर (T. Raja) देखील जोरदार हल्लाबोल केला. त्या टी. राजाला कुत्र देखील विचारत नाही. त्या टी. राजाला महाराष्ट्रातला एन राजा मिळाला पेटवा आता महाराष्ट्र. हे सर्व मुख्यंत्र्याच्या नागपूरात होतं हे दुर्दैव आहे. असं देखील विजय वडेट्टीवार म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाऱाजाशी करणाऱ्या खासदारावर देखील हल्लाबोल केला.
Seema Haider : सीमा अन् सचिनने दिली ‘गुड न्यूज’, पाचव्यांदा झाली आई
ओडिसाचा तो खासदार पागल झाला आहे. मोदींची तुलना महाराजाशी होऊ शकत नाही. आज कोरटकर सोलापूरकर हे मोकाट आहेत सरकारच्या आशिर्वादामुळे हे बिनदास्त आहेत. अशी टीका त्यांनी माध्यमांशी बोलताना केली.