Vinayak Raut On Girija Raut : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी विनायक राऊत यांच्यासह संपूर्ण कुटुंबावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सून गिरीजा राऊत यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीत गिरजा राऊत यांनी अनेक धक्कादायक खुलासे करत राऊत कुटुंबावर गंभीर आरोप केले आहे. तर आता या सर्व आरोपांवर माजी खासदार विनायक राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत घटस्फोटासाठी गिरीजा राऊत यांनी मोठी रक्कम मागितल्याचा दावा केला आहे.
माध्यमांशी बोलताना माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले की, माझ्या आणि कुटुंबियांवर लावलेले सर्व आरोप खोटे आहे. गेल्या तीन वर्षांपासून गितेश आणि गिरीजा एकत्र राहत नाही. 2018 मध्ये घटना घडली असे सांगते आणि 2026 मध्ये त्याची तक्रार करत आहेत. प्रत्येक वेळी तिचे आई-वडील तिच्यासोबत होते. सध्या त्यांची घटस्फोट केस सुरु आहे. घटस्फोट नोटिशीमध्ये दर महिन्याला खर्चासाठी 5 लाख द्यावे अशी मागणी गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी केली होती. याशिवाय 10 कोटींची अधिक रक्कम द्यायवी. मानसिक नुकसान भरपाई 2 कोटी द्यावी अशी देखील मागणी गिरीजा राऊत केली आहे. 3 रुमचं घर आणि ऑटोमॅटीक गाडी मागितली आहे. या मागण्या पूर्ण होत नाहीत म्हटल्यावर तिने तक्रार केली असा दावा विनायक राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. तसेच आम्ही अघोरी उपचारांच्या आरोपांचे पूर्ण खंडन करतो असं देखील विनायक राऊत यांनी म्हटले आहे.
फक्त इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध
तर पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत पती गितेश राऊत यांच्यावर देखील गिरीजा राऊत यांनी धक्कादायक आरोप केले आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटलं आहे की, शारीरिक संबंधांवर माझ्या पतीचे असे मत होते की, तो फक्त इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो. भारतात सेक्स करायला तो कंर्फटेबल नाही. शारीरिक जवळीक साधल्यास मला दूर लोटत तो मला सांगायचा की मी नाजूक मुलगा आहे, तुला अक्कल आहे का, मला असा कसा हाथ लावतेस तू? मुंबईच्या घरी जवळीक साधल्यास आपण इथे कसं काही करणार आईला सगळं ऐकी जाईल.
वडिलांनी निवडणूकीत 2 कोटी रुपये लावले इमेजला धक्का लागला तर…, राऊतांच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप
तळगाव, मालवणच्या घरी जवळीक साधल्यास म्हणायचा इकडे आपण कीह करु शकत नाही, खाली रवी दादाला सगळं ऐकू जाईल असे आरोप गिरीजा राऊत यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केले आहे. त्यांच्या या आरोपानंतर एकच खळबळ उडाली असून अनेक चर्चांना उधाण आले आहे.
