Water supply schemes to receive maintenance and repair funds following MLA Tanpure’s ‘Calling Attention’ motion in Legislative Assembly : अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर, कुरणवाडी, मिरी, तिसगाव, मुसळवाडी, बुऱ्हाणनगरसह अनेक प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची दुरवस्था आणि त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी निधीची कमतरता हा गंभीर प्रश्न विधानसभेत उपस्थित झाला. आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लक्षवेधीद्वारे हा मुद्दा मांडत राज्यातील बहुतांश प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांच्या नियमित देखभाल व संचालनावर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच शासनाने याबाबत तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी केली.
केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सियाचा मुजोरपणा’ कॅमेऱ्यात कैद; मीडियाकडे पाहून अश्लील हावभाव
आ. तनपुरे म्हणाले की, प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चालविणाऱ्या संस्थांचा बहुतांश खर्च वीजबिलाच्या वसुलीवर अवलंबून आहे. त्यामुळे देखभाल दुरूस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नाही. राहुरी मतदारसंघातील अनेक योजना जीर्णावस्थेत असून, पूर्वी वीजबिलावर मिळणारा ५० टक्के परतावा बंद झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. निधीअभावी देखभाल होत नसल्यामुळे दुर्घटनांचा धोका वाढत असून नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होत असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
यावर उत्तर देताना संबंधित राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी शासनाने हा प्रश्न गांभीर्याने घेतल्याचे स्पष्ट केले. राज्य शासनाने ‘ऑपरेशन अँड मेंटेनन्स-२०२६’ हे नवीन धोरण तयार केले असून, त्याअंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल, दुरुस्ती आणि नियमित संचालनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रोनाल्डोचा ऐतिहासिक पेनल्टी गोल; चाळीशीनंतर विश्वचषक नॉकआऊटमध्ये गोल करणारा पहिलाच खेळाडू
तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रांच्या परिसरात कायमस्वरूपी तारकुंपण उभारणे, सर्व मॅनहोल सुरक्षितरीत्या बंद ठेवणे, नियमित तपासणी करणे आणि योजनांच्या संचालनासाठी स्वतंत्र स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी) लागू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही मंत्र्यांनी सभागृहात सांगितले. या धोरणामुळे राज्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची कार्यक्षमता वाढेल, अपघातांना आळा बसेल आणि नागरिकांना अधिक सुरक्षित व नियमित पाणीपुरवठा उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
