Weather Update : ऑगस्ट महिना कोरडाच गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात चांगला (Weather Update) पाऊस होईल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, या महिन्यातील सुरुवातीचे तीन ते चार दिवस वगळता पाऊस (Rain) झालाच नाही. आता तर अर्धा सप्टेंबर महिना उलटला तरी देखील समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता पावसाचा आणखी एक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत अनेक ठिकाणी पाऊस होईल. मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Maratha Reservation : ‘आरक्षणाचा जसा खेळखंडोबाच मांडलायं’; मनोज जरांगे पाटील चिडले
आज राज्यात जोरदार पावसाची (Maharashtra Rain) शक्यता आहे. उत्तर बंगालच्या उपसागरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आज उत्तर पश्चिम आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या उपसागरावर आहे. पुढील 24 तासांत याचे अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर होईल, अशी शक्यता आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली तर पुढील तीन दिवस राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होईल. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस (Weather Update) होईल अशी शक्यता आहे. 15,16 आणि 17 सप्टेंबर रोजी कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. 15 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात घाट परिसरात तर 16 आणि 17 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, मागील आठवड्यात राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक या पट्ट्यात जोरदार पाऊस (Weather Update) झाला होता. नाशिक जिल्ह्याला तर पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. गोदावरी नदीची पाणी पातळीही मोठ्या प्रमाणात वाढली होती. यानंतर मात्र पावसाने पुन्हा दडी मारली आहे. उर्वरित सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाला नाही तर अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या पिकांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आजच्याच परिस्थितीत अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.
मोठी बातमी: संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा जाहीर, ‘ही’ चार विधेयके मंजूर करणार