अहमदनगरसह ‘या’ जिल्ह्यांसाठी आगामी 48 तास अत्यंत महत्वाचे…जाणून घ्या कारण

Weather Alert : मे महिना संपत आला आहे. आणि आता काही दिवसांमध्येच जून महिना सुरु होणार आहे. मात्र जूनपूर्वीच आता राज्यात पावसाचे आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही तासांमध्ये नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वाऱ्याचा गडगडाट, विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 30-40 किमी प्रतितास […]

Untitled Design   2023 04 08T090437.259

Untitled Design 2023 04 08T090437.259

Weather Alert : मे महिना संपत आला आहे. आणि आता काही दिवसांमध्येच जून महिना सुरु होणार आहे. मात्र जूनपूर्वीच आता राज्यात पावसाचे आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही तासांमध्ये नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वाऱ्याचा गडगडाट, विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले होते. दरम्यान मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु झालेला असताना वातावरणात उकडा वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमानाने 40 अंश ओलांडले आहे. मात्र आता दिलासादायक वृत्त समोर आले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार र येत्या काही तासांमध्ये नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वाऱ्याचा गडगडाट, विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Chhagan Bhujbal: महापुरुषांबद्दल इतिहासाची मोडतोड करून लिखाण करणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तीला वेळीच ठेचा

एकिकडे हवामान विभागाकडून देशातील बहुतांश भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असतानाच दुसरीकडे काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांचा तडाखा बसणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये गारपीटीची शक्यता आहे. तर, उत्तराखंडमध्ये तुफानी वारे नुकसान करण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version