Download App

बैलगाडा मालक पंढरीशेठ फडकेंचे निधन : गणपत गायकवाडांआधी राहुल पाटलांवर केला होता गोळीबार

मुंबई : महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, गोल्डनमॅन पंढरीशेठ फडके (Pandharisheth Phadke) यांचे निधन झाले. दुपारच्या सुमारास घरी जाताना गाडीतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पनवेल येथील विहिघर या मूळ गावी त्यांच्यावर  अंत्यसंस्कार होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. फडके यांच्या निधनाने बैलगाडा चालक-मालक आणि शर्यतप्रेमींमध्ये मोठी शोककळा पसरली आहे.

नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पालघर या पट्ट्यात बैलगाडा शर्यत म्हटले की पंढरीशेठ फडके यांचे नाव येतेच. गळ्यात किलोभर सोने, कमरेला लटकवलेले पिस्तुल, पायात पांढरी कोल्हापुरी, महागड्या गाड्या, किरकोळ शरीरयष्टी असे पंढरीनाथ फडकेंचे वर्णन करता येईल. खरेतर त्यांच्या आजोबांपासून त्यांच्या घरात बैलगाडा शर्यतीचा शौक केला जातो. (Well-known bullock cart owner Pandharisheth Phadke passed away)

अशोक चव्हाण, नारायण राणे अन् SM कृष्णा.. माजी मुख्यमंत्र्यांनीही सोडला काँग्रेसचा ‘हात’

महाराष्ट्रभर ज्या बैलगाडा शर्यती होतात त्यातील जिंकणाऱ्या बैलांना विकत घेऊन सांभाळण्याचे काम फडके करत होते. आत्तापर्यंत जवळपास 50 शर्यतींची बैल त्यांनी राखून ठेवली होती. यातील बादल हा महाराष्ट्रभर लोकप्रिय बैल होता. शर्यत जिंकल्यानंतर गाडीच्या टपावर बसून वरात आणि बादल बैलाची क्रेझ अशी त्यांची स्टाईल बैलगाडा शर्यतप्रेमींमध्ये प्रसिद्ध होती.

चंदीगड : विनोद तावडेंची सलग तिसऱ्या वर्षी चालाखी… पण सर्वोच्च न्यायालयाने डाव उधळला!

राहुल पाटील गोळीबार प्रकरणातनंतर राज्यात चर्चा :

पंढरीनाथ फडके आणि कल्याणचे बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यात जोरदार वाद झाला होता. फडके यांनी पाटील यांच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला होता. यानंतर पंढरीनाथ फडके यांच्यासह एकूण 32 जणांवर हत्येचा प्रयत्न आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.  त्याच रात्री विहिघर गावातून त्यांच्यासह तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात त्यांना तब्बल आठ महिने तरुंगवास भोगावा लागला होता.

follow us