Download App

अहमदनगरमध्ये तुफान दगडफेक: दोन जखमी

अहमदनगर – शहरातील कोठला परिसरातील मंगळवार बाजारात 7 वाजताच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झाले. या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले. यानंतर एका गटाकडून तुफान दगडफेक करण्यात आली. यात 2 युवक जखमी झाले आहेत तर 3 वाहनावर दगडफेक झाल्याने त्यांचे नुकसान झाले आहे.

पोलिसांनी मोहसीन नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक खैरे, पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, गुन्हे शाखेचे अनिल कटके, कोतवालीचे संपतराव शिंदे, सपोनि देशमुख पिगळे, उपनिरीक्षक सोळंके, पवार, आदी फौजफाट्याशह घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी पोलीसांकडून नागरिकांना शांत रहाण्याचे आवाहन करण्यात आले. घटनास्थळी दगडाचा खच पडला होता. यावेळी धारदार हत्यारांचा वापर करण्यात आला होता. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस परिसरात फिरून आरोपीचा शोध घेत आहेत. तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Tags

follow us