Ahmednagar Politics : अहमदनगरः राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे खासदार डॉ. सुजय विखे (Dr. Sujay Vikhe) यांच्याविरोधात आक्रमकपणे भूमिका घेऊन टीका करतात. त्याला खासदार विखे हे जोरदार प्रत्युत्तर देतात. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत विखेविरुध्द लंके अशी लढत होईल, अशा राजकीय चर्चा आहेत. आमदार लंकेही आपल्या मतदारसंघाबाहेर ही सक्रीय झाले आहेत. त्याचबरोबर त्यांचे वेगवेगळे विधान येत आहेत.
श्रीगोंदा, शेवगाव, पाथर्डी या भागात ही ते जात असतात. ते कार्यकर्त्यांना भेटत आहे. लोकसभा निवडणूक लढण्याबाबत लंके म्हणाले, मला अद्याप पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढण्याबाबत विचारणा झालेली नाही. माझ्या माहितीनुसार पक्ष इतकी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकणार नाही. पण पक्षाच्या पुढे कोणी नाही. राजकीय कारकीर्दीत कुठे जायचे आहे, याचा विचार मी केला आहे.
शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे हे माझे दैवत आहेत. पक्षातील नेत्यांनी सांगितल्यास पक्षाचा आदेश पाळावा लागेल. पक्षाच्या पुढे जाऊ शकत नाही. जबाबदारी दिली तर ती पार पाडावी लागणार आहे, असे लंके म्हणत आहे.
पक्षाने दिलेली जबाबदारी पार पडू असे लंके सांगत आहेत. त्यामुळे ते हे भविष्यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असू शकतात, अशा राजकीय चर्चा आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे चार आमदार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद या मतदारसंघात आहेत. तर लंकेही तगडे उमेदवार आहेत.