Download App

Ahmednagar Politics : खोट्या नथीच्या आडून राम शिंदेंच्या पत्नीचा रोहित पवारांवर निशाणा

  • Written By: Last Updated:

अहमदनगरर आमदार रोहित पवार (Mla Rohit Pawar) यांनी आपल्या मतदारसंघात महिलांसाठी काही दिवसांपूर्वी हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला होता. त्यात एका ८० वर्षीय आजीला नथ बक्षीस देण्यात आली होती. या महिलेला चोरट्यांनी मारहाण करून तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले होते. नथ मात्र घरात सुरक्षित ठेवली होती. नथ मोडून आजीला सोन्याचे मणी घ्यायचे होते. ती महिला ही नथ मोडण्यासाठी सराफाकडे गेल्यानंतर नथ ही बनावट निघाल्याचे उघडकीस आले. त्यावरून आता आमदार राम शिंदे (Mla Ram shinde) यांच्या पत्नी आशाताई (Ashatai) यांनी रोहित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. बारामती पर्व खोटं ठरलं, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.

जामखेड येथे हळदी कुंकू कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला जामखेडच्या माजी सभापती आशाताई शिंदे उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणात खोट्या नथेबाबतचा एक किस्ता सांगितल्या. आशाताई शिंदे यांच्या सासूबाईंची माळीण नावाची आजी ही मैत्रिण आहे. अरणगाव येथे सुनंदाताई पवार यांनी हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या ठिकाणी या आजी नाचल्या होत्या. या कार्यक्रमात माळीण मावशी यांना सोन्याची नथ बक्षीस मिळाली होती. परंतु त्यानंतर काही दिवसांनी त्यांना चोरांनी मारहाण करून त्यांच्या अंगावरील सोने काढून घेतले. नथ मात्र घरी सुरक्षित ठेवली होती. ही नथ मोडून त्यांना मणी घ्यायचे होते.

त्यासाठी त्या गावातील सराफाकडे गेल्या होत्या. पण सराफाने नथ खोटी असल्याचे सांगितले. माळीण मावशी यांनी रोहित पवारांना नथ खोटी असल्याचे सांगितले. त्यानंतर पवार यांनी दुसरी नथ माळीण मावशीला दिली. हा किस्सा आशाताई यांनीच आपल्या भाषणात सांगितला. त्यावर बारामती पर्व खोटं ठरलं, अशी टिप्पणी करत रोहित पवारांवर आशाताई यांनी निशाणा साधला.

आता बोकड, कोबंड बसं झाल. चुलीवरील भाकरी, बटाटं, वांगा खा. आता साहेबांना निवडून आणण्यासाठी तयारीला लागा, असे आवाहन आशाताई शिंदे यांनी यावेळी केले आहे. शिंदे साहेब तुमची बुलंद आणि धडाडीची तोफ आहे. दहा वर्ष त्यांनी तुमच्यासाठी काम केले आहे. आता त्यांना माझ्याकडे सोडून देऊ नका, अशी मिश्किल टिप्पणी आशाताई शिंदे यांनी केली. त्यावर कार्यक्रमस्थळी जोरदार हश्या पिकला.

Tags

follow us