Download App

संतापजनक! चोरीच्या संशयातून तरुणांना उलटं टांगून जबर मारहाण, नगर जिल्ह्यातील घटना

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : एकीकडे संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतांना दुसरीकडे मात्र, सातत्याने दलितांवर अन्याय-अत्याचाराच्या घटना घडत आहेत. आताही अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात एका तरुणाला झाडाला बांधून त्याच्यावर अमानुष कृत्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना शेळी चोरीच्या संशयावरून घडली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. (Ahmednagar crime News)

तरुणाला झाडाला उलटं लटकवून अमानुष कृत्या केल्याची ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे घडली. अधिक माहितीनुसार, या दलित तरुणांवर बकऱ्या आणि कबुतरे चोरल्याचा संशय होता. त्यामुळं या तरुणांना घरातून उचलून नेत झाडाला उलटं लटकवलं आणि त्यांच्यासोबत अमानुष कृत्य करण्यात आल्याचं पीडित तरुणांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. या मारहाणीत शुभम वाघाडे, कुणाल मगर, ओम गायकवाड, खंडागळे हे तरुण गंभीर जखमी झाले. सध्या त्यांना शिरापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात 14 जिल्ह्यांमध्ये पावसाची स्थिती चिंताजनक; जालना, सांगली, साताऱ्याला सर्वाधिक फटका 

दरम्यान, याप्रकरणी दलित संघटनांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओत तरुणांना झाडाला उलटं लटकवललं दिसत आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी अतिशय निंदनीय बाब असून अशा जातीयवादी मानसिकतेच्या लोकांवर प्रशानसाने कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Tags

follow us