Ajit Pawar : फडणवीसचं हुकमी एक्का; मंत्रिमंडळ विस्तारावर बोलतांना अजितदादांची कबुली

Ajit Pawar On Cabinet Expansion  : आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. तेव्हा त्यांनी आपल्या भाषणात मंत्रिमंडळ विस्तारावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये फडणवीसचं हुकमी एक्का म्हटलं आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर अजितदादांची कबुली… मंत्रिमंडळ विस्तार हा महत्त्वाचा विषय आहे. त्यावर आता मला वरिष्ठांवर […]

Ajit Pawar :

Letsupp Image 2023 10 23T155511.483

Ajit Pawar On Cabinet Expansion  : आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. तेव्हा त्यांनी आपल्या भाषणात मंत्रिमंडळ विस्तारावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये फडणवीसचं हुकमी एक्का म्हटलं आहे.

मंत्रिमंडळ विस्तारावर अजितदादांची कबुली…

मंत्रिमंडळ विस्तार हा महत्त्वाचा विषय आहे. त्यावर आता मला वरिष्ठांवर मंत्रिमंडळ विस्ताराची जबाबदारी देता येणार नाही. मीच ती भूमिका आता बजावत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी चर्चा केली आहे. त्यात 2022 ला जेव्हा शिंदे फडणवीसांचं सरकार स्थापन झालं तेव्हा 20 लोकांना स्थान देण्यात आलं होतं.

Shyamchi Aai: बहुप्रतीक्षित‘श्यामची आई’ चित्रपटातलं पहिलं गाणं प्रदर्शित

त्यानंतर आता बहुजन सामाजाच्या हितासाठी आम्ही सरकारमध्ये सामिल झालो. हे साध नव्हतं. त्यात आम्ही सर्वांनी 30-35 वर्ष समाजकारण आणि राजकारण केलं आहे. त्यात वरिष्ठांचं नेहमी ऐकलं आहे. तसेच आम्ही सरकारमध्ये सामिल होताना देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होतं की, ज्या प्रमाणे एकनाथ शिंदेंचे 50 आमदार आहेत भाजपचे सर्वात जास्त आमदार आहेत. पण आमचे देखील शिंदेंएवढेच आमदार आहेत. त्यामुळे आम्हाला देखील तेवढेच मंत्रिपदं मिळावेत.

महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा; दंड थोपटत अजितदादांची सरकारकडे मोठी मागणी

पण शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे काही अधिकार आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांचे आमदार जास्त आहेत. त्यामुळे त्यांचा निर्णयात सहभाग जास्त असणे साहजिक आहे. त्यात ते जो काही निर्णय घेतील. तेसच ते त्यांच्या वरिष्ठांना म्हणजे अमित शाह आणि जेपी नड्डा, पंतप्रधान मोदी यांना विचारूनच निर्णय घेत असतात. त्यात राष्ट्रवादीच्या वाट्याला जे काही येईल त्यात नाराजी होणार नाही. याची काळजी घेतली जाईल. असं अश्वासन यावेळी अजित पवारांनी दिलं.

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार हे देखील सोलापूरातील माढाच्या दौऱ्यावर जाणार होते. त्यामुळेच अजित पवारांचा सोलापूर दौरा खास होता. कारण अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार आणि शरद पवार हे अशा प्रकारे एकाच ठिकाणा दौऱ्यासाठी जाणार होते मात्र ऐनवेळी शरद पवारांनी त्यांचा सोलापूर दौरा रद्द केला.

Exit mobile version