Download App

मंडलिकांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मिटकरींचा संताप; म्हणाले, संजय मंडलिकांनी वक्तव्य देताना…

Amol Mitkari replies Sanjay Mandlik : कोल्हापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं. आत्ताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. विरोधकांनी महायुतीवर टीकेची झोड उठविली आहे तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील नेते मंडळीही अस्वस्थ झाली आहेत. मंडलिक यांच्या या वक्तव्यावर आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी (Amol Mitkari) जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मिटकरी म्हणाले, संजय मंडलिकांचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही पण, तु्म्ही सांगताय त्या पद्धतीनं जर असेल तर त्यांचं हे वक्तव्य अत्यंत निषेधार्ह आहे. छत्रपती शाहू महाराज यांचे ते थेट वंशज आहेत. निवडणूक लढणे हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. पण टीका करत असताना थेट छत्रपती शाहू महाराज यांच्या वंशजांबाबत अशी वक्तव्ये होत असतील तर मी फुले, शाहू आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून संजय मंडलिक यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. त्यांचं हे वक्तव्य कुणीच स्वीकारणार नाही. त्यांचं हे वक्तव्य साफ चुकीचं आहे. त्यांनी वक्तव्य करताना भान ठेवावं.

Lok Sabha Election ड्युटीवर न येणाऱ्या शिक्षकांवर कारवाई; निवडणूक आयोग ठाम

काय म्हणाले होते संजय मंडलिक ?

महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूर लोकसभेतून उमेदवारी (Kolhapur Lok Sabha Constituency) देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी आता जोरदार प्रचार सुरू केला आहे. ते सातत्याने शाहू महाराज आणि काँग्रेसवर टीका करत आहेत. आताही एका प्रचारसभेत बोलताना संजय मंडलिक यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. मंडलिक म्हणाले, आत्ताचे महाराज कोल्हापूर येथील आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही आणि कोल्हापूरमधील जनता हीच खरी वारसदार आहे. माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जपल्याचं मंडलिक म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज