Ajit Pawar : रामदेव बाबांच्या नादी लागले अन्…. ‘डोकच पुढं करुन दाखवलं’

अहमदनगर : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्जतमध्ये (Karjat) आपल्या भाषणात भन्नाट किस्सा सांगितला. त्यांनी किस्सा सांगितल्यावर समोर बसलेल्या लोकांमध्ये एकच हश्शा पिकला. अजितदादा कर्जतमध्ये म्हणाले, ”माझी तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही सगळे नखाला नखं घासता का, अशी नखावर नखं घासली की, डोक्यावर केसावर केसं येतात. पण केसं यायचं तर बाजूला राहिलं, काही […]

Untitled Design (9)

Untitled Design (9)

अहमदनगर : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्जतमध्ये (Karjat) आपल्या भाषणात भन्नाट किस्सा सांगितला. त्यांनी किस्सा सांगितल्यावर समोर बसलेल्या लोकांमध्ये एकच हश्शा पिकला.

अजितदादा कर्जतमध्ये म्हणाले, ”माझी तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही सगळे नखाला नखं घासता का, अशी नखावर नखं घासली की, डोक्यावर केसावर केसं येतात. पण केसं यायचं तर बाजूला राहिलं, काही खरं नाही, असं म्हणत अजितदादांनी आपल्या डोक्यावर केसं नाही”, असं दाखवण्यासाठी डोकच पुढे केलं होतं.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत या रोहित पवारांच्या मतदारसंघात अंबालिका कारखान्यावर शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी अजित पवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी बुवाबाजीच्या नांदाला लागू नका असा सल्ला अजितदादांनी दिला.

बुवा लोकांचं काही ऐकू नका, साधू संतांचे ऐका, महापुरुषांचा ऐका. अहिल्याबाई होळकर यांचं ऐका, शाहु-फुले-आंबेडकर असतील. मौलाना आझाद असतील त्यांचं ऐका. या सगळ्या महान व्यक्तींचं ऐका, पण, बुवाबाजीचं काही ऐकू नका.

नखाला नखं घासू नका, काही तरी तिसरच व्हायचं, डॉक्टरकडे गेल्यावर ते सुद्धा म्हणतील तुम्हाला कुणी करायला सांगितलं, त्यामुळे बुवाबाजीचं ऐकू नका, असा सल्ला अजितदादांनी देताच मेळाव्यात एकच हश्शा पिकला.

Exit mobile version