UdayanRaje-Amit Thackeray Met : उदयनराजेंच्या भेटीने हशा पिकला, अमित ठाकरेंही लाजले

सातारा : मनसे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.त्यांनी राज्यसभेचे खासदार उदयनराजे (MP Udayanaraje) यांची सातारा येथे भेट घेऊन दौऱ्याला सुरुवात केलीय. यावेळी उदयनराजेंनी अमित ठाकरेंना खास भेट दिली. त्यांच्या या भेटीमुळे चांगलाच हशा पिकला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि नेते अमित ठाकरे यांनी आज साताऱ्यात राज्यसभेचे खासदार […]

Untitled Design (10)

Untitled Design (10)

सातारा : मनसे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.त्यांनी राज्यसभेचे खासदार उदयनराजे (MP Udayanaraje) यांची सातारा येथे भेट घेऊन दौऱ्याला सुरुवात केलीय. यावेळी उदयनराजेंनी अमित ठाकरेंना खास भेट दिली. त्यांच्या या भेटीमुळे चांगलाच हशा पिकला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि नेते अमित ठाकरे यांनी आज साताऱ्यात राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी अमित ठाकरेंना खास भेट दिली. काय भेट दिली हे उदयनराजेंनी सांगितले तेव्हा अमित ठाकरे चांगलेच लाजले आणि हशा पिकला.

अमित ठाकरे यांनी साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधी स्थळाची भेट घेवून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात केली. यानंतर त्यांनी शिवतिर्थावर नतमस्तक होऊन खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.

विशेष म्हणजे, उदयनराजेंनी अमित ठाकरेंना एक खास परफ्युम भेट दिला. हाच परफ्युम का हे सुद्धा सांगितलं. ‘Bvlgari men हा परफ्युम खासदार उदयनराजे यांनी अमित ठाकरे यांना भेट दिला यावेळी ‘तू लहान राहिला नाहीस मोठा माणूस झाला आहे आणि आमच्या सगळ्यांची काळजी घेतली पाहिजेस म्हणून हा परफ्युम दिला आहे, असं उदयनराजे भोसले म्हणताच शेजारी अमित ठाकरेंना चक्क लाजले होते.

तर, साताऱ्यात आलो आणि राजेंना भेटलो नाही असं होवू शकत नाही. ही भेट राजकीय नव्हती वैयक्तिक होती, असं अमित ठाकरे यांनी सांगितलं. राजे किती दिलखुलास आहेत याची आत गप्पा मारताना प्रचिती आली, असं वक्तव्य करताच एकच हशा पिकला.

Exit mobile version