गुड न्यूज ! नगरकरांना लवकरच मिळणार ‘अमृतचे’ पाणी

नगरकरांसाठी आता आनंदाची बातमी आहे. बहुप्रतिक्षीत अमृत पाणी योजनेचे काम अखेर पूर्ण झाले आहे. येत्या आठ दिवसांत अमृत योजनेचे पाणी नगरकरांना मिळणार आहे. अहमदनगर महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांनी हे जाहीर केले आहे. BCCI चा प्लेऑफसाठी नवा उपक्रम, डॉट बॉल टाकल्यास… करावे लागणार ‘हे’ काम नगरकरांना पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी अमृत पाणी योजना […]

Ahmednagar Corporation

Ahmednagar Corporation

नगरकरांसाठी आता आनंदाची बातमी आहे. बहुप्रतिक्षीत अमृत पाणी योजनेचे काम अखेर पूर्ण झाले आहे. येत्या आठ दिवसांत अमृत योजनेचे पाणी नगरकरांना मिळणार आहे. अहमदनगर महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांनी हे जाहीर केले आहे.


BCCI चा प्लेऑफसाठी नवा उपक्रम, डॉट बॉल टाकल्यास… करावे लागणार ‘हे’ काम

नगरकरांना पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी अमृत पाणी योजना राबविण्यात आली आहे. एक नोव्हेंबर २०१७ योजनेच्या कामाला कार्यारंभ आदेश देण्यात आली आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी तब्बल सहा वर्षांचा कालावधी लागली आहे. मुळा धरण ते नगर शहरातील वसंत टेकडीपर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे. तब्बल ३४ किलोमीटरची ही जलवाहिनी आहे. ही जलवाहिनी टाकण्यासाठी अनेक अडथळे आले आहेत. आता ३४ किलोमीटर जलवाहिनीची चाचणी पूर्ण झाली आहे. गेल्या सात वर्षात अडथळ्यांची शर्यत पार करीत अखेर ही योजना पूर्णत्वास आली आहे.

नाना पटोले, धनंजय मुंडे, रामराजे नाईक निंबाळकर, रवींद्र धंगेकर लागले खासदारकीच्या तयारीला!

गेल्या काही वर्षांत शहरात झपाट्याने लोकवस्ती वाढत आहे. जुन्या योजनेतील पाणी पुरे पडत नाही. विविध भागात पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने नगरकरांना सतत पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. अमृत योजनेमुळे नगरकरांची पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. नगर शहरातील प्रतिदिन १०२ दशलक्ष लीटर पाण्याची मागणी आहे. सध्या प्रतिदिन ७७ दशलक्ष लीटर पाणी मिळते. अमृत योजनेतून प्रतिदिन १६ दशलक्ष लीटर पाणी मिळणार आहे.

Exit mobile version