Maratha Andolan : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) हे पुन्हा आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. हे निर्णायक उपोषण असेल जर मागण्या मान्य झाल्यास मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. आंतरवाली सराटीमध्ये हजारो लोक आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्याचा पडसाद आता राज्यभरात उमटू लागले आहेत.
एवरेस्टच्या हिंगाच्या विक्रीवर ‘FSSAI’कडून तातडीने बंदी; तपासणीत ठरवून दिलेल्या निकषांवर अपयश
सोलापूरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत. माढामध्ये मराठा आंदोलकाने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला आहे. धावत्या गाडीमागे पळत जाऊन बापू गायकवाड या आंदोलकाने बाबासाहेब पाटील यांच्या गाडीखाली घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा या आंदोलकगाने दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकाला गाडीखालून ओढत बाहेर काढले. आंदोलकाला बाहेर काढण्यात आल्यानंतर बाबासाहेब पाटील यांचा ताफा तुळजापूरच्या दिशेने रवाना झाला आहे.
नेपाळमध्ये पुराच्या पाण्यात वाहून आलेली बँकेची तिजोरी लुटली, आतापर्यंत 29 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन; कोल्हापुरात निदर्शने
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देत कोल्हापुरात निदर्शने करण्यात येत आहेत. दसरा चौक याठिकाणी ही निदर्शने सुरू आहेत. कोल्हापूर गॅझेट लागू करा, अशी मागणी या निदर्शनातून करण्यात येत आहे. आता जर मागण्या मान्य झाल्या नाही तर मराठा समाज लाखोंच्या संख्येने मुंबईत धडकणार असा इशारा या निदर्शनामधून देण्यात आला आहे. या आंदोलनात अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक सहभागी झाले आहेत.
वडीगोद्रीत मराठा आंदोलकांचा रास्ता रोकोचा प्रयत्न; पोलिसांच्या हस्तक्षेपाने आंदोलन मागे
धुळे-सोलापूर महामार्गावरील वडीगोद्री येथे मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको आंदोलन करून वाहने रोखून धरली.सरपंच यांची मध्यस्थी आणि पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे या आंदोलकांची समजूत घालण्यात घालण्यात आली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
