SamarjeetSingh Ghatage : राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे भाजप सोडणार असलल्याचे बोलले जात होते. पण आता माझे राजकीय गुरु हे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील आहेत. त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असे म्हणत त्यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चांणा पूर्णविराम दिला.
दोन्ही गटांचा राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा; ठोठावलं निवडणूक आयोगाचं दार
कोल्हापूरमधील कागल येथे हसन मुश्रीफ व समरजितसिंह घाटगे यांच्यातील वैर लपून नाही. मुश्रीफ मंत्री झाल्याने घाटगेंची कोंडी झाल्याचे बोलले जात होते. पण यावर घाटगेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बुद्रुकसाठी मी का पार्टी सोडायची असे म्हणत त्यांनी मुश्रीफांना टोला लगावला.
Chagan Bhujbal : राजकारणातून संन्यास घेणार का?, भुजबळांनी दिलं रोखठोक उत्तर
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात, की आधी राष्ट्र, मग पक्ष त्यानंतर स्वत असा आपला आदर्श आहे. मुख्यमंत्री असलेला माणूस उपमुख्यमंत्री होऊ शकतो, कोल्हापूरचा माणूस पुण्याला निवडणूक लढवू शकतो, ही आपली पक्ष निष्ठा आहे. हेळसांड, कुचंबणा झाली म्हणून मी गुरू बदलणारा नाही. काहींनी अनेक गुरु बदलले असे म्हणत त्यांनी मुश्रीफांवर निशाणा साधला. तसेच गुरुनिष्ठा हे आपल्या रक्तामध्ये संस्कार आहे. गुरु म्हटला जा तर सोडणार, गुरुच्या आदेशाने सोडणार असे घाटगे म्हणाले. त्यामुळे 2024 साली समरजीत घाटगे हे विधानसभेला कागलमधून अपक्ष उभे राहणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.
तसेच यावेळी त्यांनी आपण विधानसभा निवडणूक फक्त लढविणार नसून रेकॉर्ड फरकाने जिंकणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नुकतेच भाजपसोबत आलेले अजित पवार व त्यांचे सहकारी हसन मुश्रीफ यांची चिंता वाढणार आहे. अजित पवारांच्या शपथविधीला दोन दिवस पूर्ण होत असतानाच दुसरीकडे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी हा वाद चव्हाट्यावर आला आहे.